Join us  

‘या’ मुलाने अमिताभ बच्चनला बनविले सुपरस्टार; आज तो अरबोंच्या संपत्तीचा मालक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 2:19 PM

‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातील एका सडपातळ बांध्याचा अन् निरागस चेहºयाचा गरीब आणि चिंताग्रस्त मुलगा तुम्हाला आठवतो काय? चला ...

‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातील एका सडपातळ बांध्याचा अन् निरागस चेहºयाचा गरीब आणि चिंताग्रस्त मुलगा तुम्हाला आठवतो काय? चला आम्ही त्या मुलाचा तो गाजलेला सीन्स तुम्हाला सांगतो. एक चोर एका महिलेची पर्स घेऊन पळून जात असतो. तेवढ्यात हा मुलगा त्या चोराशी दोन हात करतो अन् ती पर्स त्याच्याकडून हिसकावून घेत त्या महिलेला परत करतो. मात्र मुलाच्या चेहºयावरील चिंता बघून ती महिला त्याची आदराने विचारपूस करते अन् पुढे त्याला मुलाचा दर्जा मिळतो. अशा पद्धतीने एका अनाथ अन् बेघर मुलाला हक्काचे घर मिळते. पुढे जाऊन हाच मुलगा अमिताभ बच्चन बनतो. आता तो मुलगा तुम्हाला नक्कीच आठवला असेल. ७०, ८० च्या दशकातील महानायक अमिताभ बच्चन यांचे बरेचसे चित्रपट  आहेत, ज्यामध्ये अमिताभच्या लहानपणाची भूमिका दाखविण्यात आल्या आहेत. मात्र जेव्हा अमिताभला पडद्यावर साकारणाºया या बालकलाकाराविषयी विचार केला जातो, तेव्हा अनेकांना त्याच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. आज आम्ही याच मुलाविषयी तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांने अमिताभ यांच्या सुपरस्टार होण्याच्या प्रवासात मोलाची भूमिका बजावली आहे. हा मुलगा आज अरबो रुपयांच्या साम्राज्याचा मालक असून, त्याच्याविषयी जाणून घ्याल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या मुलाचे नाव मयूर राज वर्मा असे असून, त्याने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बहुतांश चित्रपटांमध्ये त्याने अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्यामुळे त्याला आजही ‘यंग अमिताभ’ या नावाने ओळखले जाते. मयूर राज वर्मा याने ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाचा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात यशस्वी चित्रपट म्हणून उल्लेख केला जातो. कारण या चित्रपटाने त्यावेळी डायमंड जुबली सेलिब्रेट केली होती. याच चित्रपटामुळे मयूर राज वर्मा म्हणजेच ‘मास्टर मयूर’ रातोरात सुपरस्टार बनला होता. अमिताभ बच्चनची लहानपणीची भूमिका साकारून जेवढी प्रसिद्धी मयूर वर्माने मिळविली तेवढी प्रसिद्धी आतापर्यंत एकाही बालकलाकाराला मिळाली नाही. या चित्रपटानंतर अमिताभ यांच्या प्रत्येक चित्रपटात मयूर राज वर्मा याला साइन केले जाऊ लागले. हळूहळू मयूर जबरदस्त लोकप्रिय होत गेला. त्यामुळे मयूर हा त्याकाळातला सर्वाधिक फीस घेणारा बालकलाकार होता. असे म्हटले जात आहे की, अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’ची छबी बनविण्यात काही प्रमाणात मयूरचाही वाटा आहे. कारण मयूर ज्या तल्लीनतेने आणि गंभीरतेने लहानपणीचा अमिताभ पडद्यावर साकारायचा त्यात प्रेक्षकांना लहानपणी अमिताभ असाच असेल, असा भास झाल्याशिवाय राहत नसे. मात्र नंतरच्या काळात मयूर राज वर्मा बॉलिवूडमधून गायब झाला. कित्येक वर्षे त्याच्याविषयीची कुठलीच बातमी समोर आली नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, मयूर आज कोठे आहे? मयूर राज वर्मा आज वेल्स येथे वास्तव्यास असून, त्याला दोन मुले आहेत. मयूर वेल्स येथील प्रसिद्ध व्यावसायिक आहे. त्याठिकाणी तो पत्नीसोबत इंडियाना रेस्टॉरंटचा व्यवसाय करतो. त्याची पत्नी एक प्रसिद्ध शेफ आहे. या व्यतिरिक्त मयूर वेल्स येथील लोकांना बॉलिवूडकडे आकर्षित करण्याचाही प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तो वर्क शॉप आणि अभिनयाचे धडे देण्यासाठी क्लासेसदेखील आॅर्गनाइज करीत असतो. तसेच मयूर राज वर्मा याने नॉर्थ वेल्सच्या टूरिझम बोर्डासोबत ‘वेल्स अनलिमिटेड’ नावाची एक टूरिझम कंपनीही सुरू केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून तो लोकांना अशा ठिकाणची सहल घडवून आणतो जे ठिकाणे त्यांनी पडद्यावर बघितली आहेत. मयूरच्या या यशावर दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनाही प्रचंड अभिमान आहे.