Join us

Opps​ : अन् त्याने आलिया भट्टला समजले श्रद्धा कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 14:11 IST

आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर या दोघींमध्ये चाहते गोंधळलेय? आता याला काय म्हणाल? आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे. ...

आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर या दोघींमध्ये चाहते गोंधळलेय? आता याला काय म्हणाल? आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे. तिचा प्रत्येक चित्रपट हिट होतोय. तिची फॅन फॉलोर्इंगही जबरदस्त आहे. असे असूनही लोक तिला चांगल्याप्रकारे ओळखत नाहीयेतं, म्हणजे जरा अतिच झाले.काही दिवसांपूर्वीचीच एक बातमी होती. आलियाला लंडनच्या एका डान्स क्लबमध्ये एन्ट्री नाकारण्यात आली. कारण त्या क्लबमध्ये १८ वर्षांखालील लोकांना एन्ट्री नव्हती. म्हणजेच त्या डान्स क्लबमध्ये आलियाला लहान मुलगी समजून रोखण्यात आले होते. अलीकडे आलियावर पुन्हा अशीच काहीशी वेळ आली. एका पब्लिक प्लेसमध्ये आलिया आपल्या कारमध्ये बसणार तोच, एक चाहता तिच्याजवळ आला अन् मग धम्मालच झाली.तो चाहता पूर्णवेळ आलियाला श्रद्धा कपूर म्हणून बोलत राहिला. श्रद्धा तू जबरदस्त अ‍ॅक्टिंग करते. ‘हाफ गर्लफ्रेन्ड’मध्ये तू कमाल केलीयेय, असे हा चाहता म्हणाला. त्या चाहत्याचे ते शब्द ऐकून आलियाला हसावे की रडावे तेच कळेना. अखेर क्षणभर सावरल्यानंतर श्रद्धा नाही, आलिया म्हण, असे तिने त्या चाहत्याला सांगितले. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण करण जोहरच्या बर्थ डे पार्टीदरम्यान मीडियाशी बोलताना आलियाने स्वत: असे काही घडल्याचे कबुल केलेय. आलिया स्वत: हा धम्माल किस्सा सांगत, जोर जोरात हसत सुटली होती.ALSO READ : सिद्धार्थ मल्होत्राच्या आई-वडिलांना भेटली आलिया भट्ट; मग काय झाले ते वाचाच!यापूर्वी ‘उडता पंजाब’च्या शूटदरम्यानही आलियासोबत असेच काही घडले होते. पंजाबातील अनेक बायका मला ओळखतही नव्हत्या, माझे नाव माहित असणे तर दूरच, असे आलिया म्हणाली होती. मी अद्याप सुपरस्टार झालेली नाहीय, अशी प्रामाणिक कबुलीही तिने दिली होती. कदाचित हेच आलियाचे मोठेपण आहे. यश मिळूनही आलियाचे पाय जमिनीवर आहेत, हेच यावरून म्हणायला हवे.