स्वरा भास्करच्या खुल्या पत्राला टीम ‘भन्साळी’चे खुल्या पत्रानेच उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 15:31 IST
संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ अनेक वादानंतर रिलीज झाला खरा. पण आता इंडस्ट्रीतीलचं काही लोकांनी या चित्रपटाविरोधात विरोधाचा सूर आवळला ...
स्वरा भास्करच्या खुल्या पत्राला टीम ‘भन्साळी’चे खुल्या पत्रानेच उत्तर!
संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ अनेक वादानंतर रिलीज झाला खरा. पण आता इंडस्ट्रीतीलचं काही लोकांनी या चित्रपटाविरोधात विरोधाचा सूर आवळला आहे. होय, अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे नाव यात सगळ्यांत वरचे आहे. ‘पद्मावत’मध्ये सतीप्रथेचे अर्थात ‘जौहर’चे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप स्वराने केला असून यासंदर्भात प्रेक्षक या नात्याने एक खुले पत्रही लिहिले आहे. ‘पद्मावत’मध्ये महिलांची एक वेदनादायी प्रतिमा मांडली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा स्त्रियांना भूतकाळात घेऊन गेला. स्त्रियांना, विधवांना, बलात्कार पीडितांना या समाजात पुरुषांच्या संमतीशिवाय मानाने जगण्याचा खरंच अधिकार नाही का? स्वतंत्र भारतात अशा प्रकारे सती प्रथेचं उदात्तीकरण करणं हा गुन्हा आहे. तिकीट काढून तुमचा चित्रपट बघणाºया प्रत्येकाला उत्तर देणे तुमची जबाबदारी आहे, असे स्वराने आपल्या खुल्या पत्रात लिहिले आहे. स्वराच्या या खुल्या पत्राला भन्साळींच्या टीमने उत्तर दिले आहे. भन्साळींच्याच ‘गोलियों की रासलीला- रामलीला’चे सहलेखक सिद्धार्थ आणि गरिमा यांच्या जोडीने स्वराच्या खुल्या पत्राला खुल्या पत्राने उत्तर दिले आहे. An open letter to all the offended vaginas या शीर्षकाखाली सिद्धार्थ व गरिमा यांनी आपली बाजू मांडली आहे. आपल्या पत्रात सिद्धार्थ आणि गरिमा यांनी स्त्रीवादाची व्याख्या स्पष्ट केली आहे. ‘स्वराने आपल्या खुल्या पत्रात महिलेच्या ज्या अंगाचा उल्लेख केला आहे, त्या अंगात जीवन देण्याची क्षमता आहे. कुठल्याही पुरूषात ही क्षमता नाही. इंडस्ट्रीतील काही मेकर्स, आर्टिस्ट आणि अॅक्टर्सला असे वाटते की, तेच स्त्रिवादाचे पुरस्कर्ते आहेत. राणी पद्मावतीने शत्रूला शरण जाण्याऐवजी ‘जौहर’चा निर्णय घेतला असेल तर तो तिचा स्वत:चा निर्णय आहे. त्या काळात स्वत:ला अग्निकुंडात भस्म करण्याचा निर्णय घेणाºया महिलांना चुकीचे ठरवले जाऊ शकत नाही. गुलामीचे जीवन आणि क्रूर मृत्यूऐवजी आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी जो मार्ग निवडला, तो त्यांचा स्वत:चा निर्णय होता. ७०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या आधारावर कुठलाही निष्कर्ष काढणे गैर आहे, ’असे भन्साळींच्या टीमने म्हटले आहे. ALSO READ : ‘पद्मावत’वरून या अभिनेत्रीने संजय लीला भन्साळीला सुनावले!