Join us  

बॉलिवूडमधील स्टार किड्सच्या यादीत पडणार आणखीन एक भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 8:00 AM

बॉलिवूडचा चीची म्हणजेच अभिनेता गोविंदाचा मुलगा यशोवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचे समजते आहे.

ठळक मुद्देगोविंदाचा मुलगा यशोवर्धन लवकरच करणार बॉलिवू़डमध्ये एन्ट्री

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या संख्येत वाढ होत असून आता या यादीत आणखीन एका स्टार किड्सची भर पडणार आहे. आता कोणत्या कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. बॉलिवूडचा चीची म्हणजेच अभिनेता गोविंदाचा मुलगा यशोवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचे समजते आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाने आपला मुलगा यशोवर्धनला बॉलिवूडमध्ये लॉंच करण्याची तयारी केली आहे. यशोवर्धन नुकताच विदेशात शिक्षण घेऊन परतला आहे. त्यामुळे त्याला लवकरच बॉलिवूडमध्ये लाँ केले जाईल, असे खुद्द गोविंदानेच सांगितले आहे. मात्र यशला लाँच करा, असे आपण कोणालाही सांगणार नाही. त्याला आपला रस्ता स्वतःच निवडावा लागणार आहे, असेही गोविंदाने स्पष्ट केले आहे.

जेव्हा त्याला एखादा चांगला रोल दिला जाऊ शकतो, असे एखाद्या प्रोड्‌क्‍शन हाऊसला वाटले तर त्याचे लाँचिंग होईल. त्यासाठी यशवर्धननेच स्वतः निर्मात्यांना जाऊन भेटले पाहिजे. बोलले पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतःही खूप संघर्ष केला आहे. तसच संघर्ष यशनेही केला तरच त्याला यशस्वी होण्याचे महत्व समजू शकेल, असे गोविंदा म्हणतो. आपण स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. याचे आपल्याला दुःख आहे. मात्र आपल्या मुलाने विदेशात जाऊन स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे त्याला आपल्यापेक्षा फिल्म मेकिंगचे आपल्यापेक्षा अधिक ज्ञान आहे, याचा आपल्याला खूप अभिमान वाटतो आहे, हे सांगण्यासही गोविंदा विसरला नाही.आता गोविंदाचा मुलगा यशोवर्धन कोणत्या चित्रपटात पाहायला मिळणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :गोविंदा