Join us  

OMG! करण जोहरच्या बाथरुममध्ये तासन् तास काय करती होती सारा? कारण ऐकून सगळे झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 11:44 AM

सारा अली खान (sara Ali Khan)ने नुकतेच कॉफी विद करण (Koffee With Karan) शोमध्ये हजेरी लावली. जिथे तिच्याबद्दल मोठा खुलासा झाला.

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो कॉफी विद करण (Koffee With Karan) नवीन सीझनने कमबॅक केले आहे. असे वाटत आहे की करण जोहरच्या नव्या सीझनमध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) आणि धनुष (Dhanush) पहिले गेस्ट ठरले आहेत. खरेतर शोमध्ये सारा अली खान आणि धनुष त्यांचा आगामी चित्रपट अतरंगी रे (Atrangi Re)च्या प्रमोशनसाठी आले आहेत.

सारा अली खान यावेळी अतरंगी रे चित्रपटातील चकाचक गाण्यामधील हुकस्टेप करताना दिसली. अशात सारा अली खान हे बोलून करण जोहरला चकीत करणार आहे की लॉकडाउन दरम्यान गोव्यातील घरामधील वॉशरूममध्ये या गाण्याची प्रॅक्टिस करत होती. धनुष आणि सारा जेव्हा करण जोहरच्या या मजेशीर शोमध्ये पोहचले तेव्हा होस्टने त्यांना सांगितले की, हे गाणे त्यांनी तेव्हा ऐकले जेव्हा ते सारासोबत गोव्यात होते.

साराने या गाण्यासाठी घेतली खूप मेहनत- करण जोहर

करण जोहर म्हणाला की, मला हे गाणे माहित आहे. मी हे गाणे पहिल्यांदा सारासोबत गोव्यात असताना ऐकले होते. सारा या गाण्याच्या रिहर्सलसाठी आली होती. सारासोबत तिचा कोरिओग्राफरदेखील होता. करणने विचारले की, हे तेच गाणे होते ना. त्यावर सारा हो म्हणाली. करण जोहर म्हणाला की, जेव्हा मी गाणे ऐकले तेव्हा म्हटले की, ओह माय गॉड हे तेच गाणे आहे ज्यावर सारा खूप मेहनतीने सराव करत होती.

करण म्हणाला- माझ्या बाथरूममध्येेही...त्यानंतर सारा म्हणाली की, तुमच्या बाथरूममध्येही. सारा पुढे म्हणाली की, मला सांगायचे तुम्हाला सांगायचे नव्हते पण आता वाटते की सांगू शकते. तुमच्या खोलीत खूप छोटा आरसा होता पण बाथरूममध्ये खूप मोठा आरसा होता. करण ऐकून शॉक्ड झाला आणि म्हणाला की, माझ्या बाथरूममध्येही तू चका चकिंग करत होती. सारा म्हणाली की, लॉकडाउननंतर जेव्हा मी पहिला शॉट दिला त्यात चकाचक होते. आम्ही लोक सहा महिन्यांपर्यंत लॉकडाउनमध्ये राहिलो. त्यानंतर ही पहिली गोष्ट होती जी मी केली.

टॅग्स :करण जोहरसारा अली खानधनुषअतरंगी रे