Join us  

OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 12:11 PM

‘एबीसीडी 3’ या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण व कॅटची जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसेल. ताजी बातमी खरी मानाल तर ‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे.

ठळक मुद्देवरुणचा याआधी आलेल्या ‘सुई धागा’ या चित्रपटाचे समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. पण बॉक्सआॅफिसवर अपेक्षेइतकी कमाई करण्यास हा चित्रपट अपयशी ठरला होता. पण याऊपर वरुणचा इंडस्ट्रीतील भाव कमी झालेला नाही.

वरुण धवन आणि कॅटरिना कैफ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, वरुण व कॅटरिना लवकरच ‘एबीसीडी 3’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण व कॅटची जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसेल. ताजी बातमी खरी मानाल तर ‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. हा चित्रपट भव्यदिव्य रूपात शूट केला जाणार आहे. प्रेक्षकांसाठी तो 4 डी आणि आयमॅक्स फॉर्मेटमध्ये रिलीज होणार आहे. आणखी एक ताजी खबर खरी मानाल तर या चित्रपटासाठी वरुणने २१ कोटी रूपयांचे मानधन मागितले आहे. विशेष म्हणजे, ‘एबीसीडी 3’चे निर्माता हे मानधन द्यायला तयार झाल्याचेही कळतेय.

वरुणचा याआधी आलेल्या ‘सुई धागा’ या चित्रपटाचे समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. पण बॉक्सआॅफिसवर अपेक्षेइतकी कमाई करण्यास हा चित्रपट अपयशी ठरला होता. पण याऊपर वरुणचा इंडस्ट्रीतील भाव कमी झालेला नाही. वरुणला नव्या जनरेशनमधील ‘पैसावसूल स्टार’ मानले जाते. ‘एबीसीडी 3’च्या निर्मात्यांनाही हेच वाटते. त्यामुळे त्यांनी वरुणला २१ कोटी मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचसोबत वरूण आपल्या जनरेशनमधील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार बनला आहे.

‘एबीसीडी 3’चे शूटींग पुढील वर्षी जानेवारीत सुरु होणार आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल फार माहिती समोर आलेली नाही. पण दिग्दर्शक रेमो डिसूजा एक आऊट अ‍ॅण्ड आऊट डान्स फिल्म बनवू इच्छितो. त्यामुळे यात वरुण व कॅटचा कुठलाही रोमॅन्टिक अँगल दाखवण्याच्या त्याचा मूड नाहीये. चित्रपटात पाच  गाणी असणार आहेत. याची कोरिओग्राफी खास असणार आहे. म्हणजेचं, आत्तापर्यंत कधीही पडद्यावर दिसले नाहीत असे काही डान्स मुव्हज् यात दिसतील.

टॅग्स :वरूण धवनकतरिना कैफरेमो डिसुझा