Join us  

'तूम बिन' सिनेमातल्या अभिनेत्याची झाली अशी अवस्था ओळखणेही कठिण,चार्मिंग हिरोचा लूक पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 3:57 PM

. बॉलीवुडमध्ये हिमांशु 12 सिनेमे केले पण ते सगळेच सिनेमे फ्लॉप ठरले. त्यानंतर निर्मिती क्षेत्राताही त्याने आपले नशीब आजमवले तिथेही त्याला फारसे यश मिळाले नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर त्यांच्याबद्दल काहीच माहिती समोर येत नाही. कलाकरांचीही जादू कमी झाल्याने अज्ञातवासातच असतात. असाच एक अभिनेता सध्या  चर्चेत आला आहे. त्याचा आत्ताचा लूक पाहून  त्याला ओळखणेही कठिण आहे. 

एकेकाळी चार्मिंग लूकमुळे तरुणी त्याच्यावर फिदा व्हायच्या. तुम बिन सिनेमातून तो प्रकाश झोतात आला होता तो अभिनेता आहे हिमाशू मलिक. हिमांशू मलिकच्या अभिनयाप्रमाणेच त्याच्या लूकवरही तरुणी घायाळ व्हायच्या. मात्र आता त्याचा ख-या आयुष्यातील लूक पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

 

त्याचे वजनही खूप वाढल्याचे पाहायला मिळतंय. पूर्वासारखा चार्मही त्याच्या चेह-यावर दिसत नाही. त्यामुळे पूर्वीसारखाच हँडसम तो आता दिसत नाही. इंटरनेटवर त्याचा सध्याचे फोटो पाहायला मिळतात. पण आता तो काय करतो ? कुठे आहे याबाबतची फारशी माहिती कोणालाच नाही. 

हिंमाशूने आपल्या करिअरच्या सुरुवातीला मॉडेलिंग केले होते. त्यानंतर त्याचा 'दीवाना' हा अल्बम गाजला होता.हा अल्बम प्रचंड हिटही ठरला होता.हिमांशुने 1996 मध्ये फिल्म 'काम सूत्रः द टेल ऑफ स्टोरी' मधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. यानंतर त्याला सिनेमाच्याही ऑफर मिळत गेल्या. 2000 मध्ये 'जंगल' सिनेमात तो झळकला. 2001 में हिमांशु मलिक 'तुम बिन' सिनेमात झळकला. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने चांगली कमाई करत रसिकांचीही पसंती मिळवली होती. हिमांशुसह  संदली सिन्हा आणि प्रियांशु चटर्जी यांनीही काम केले होते.

2003 मध्ये मल्लिका शेरावतबरोबर 'ख्वाहिश'मध्ये झळकला. हा सिनेमा खूप बोल्ड होता. सिनेमात हिमांशुने मल्लिकासह चक्क 17 किस सीन दिले होते. बोल्ड सीन्सचा भरणा असलेला हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरला. यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. ‌हिमांशु ने 'एलओसी कारगिल' 'ख्वाहिश' 'रोग' आणि 'रेन' सारखे सिनेमे केले. पण हे सगळे सिनेमे फ्लॉप ठरले. बॉलीवुडमध्ये हिमांशु 12 सिनेमे केले पण ते सगळेच सिनेमे फ्लॉप ठरले. त्यानंतर निर्मिती क्षेत्राताही त्याने आपले नशीब आजमवले तिथेही त्याला फारसे यश मिळाले नाही.