Join us

OMG !! ​कान्समध्ये सोनमने निवडलेली साडी होती बॉयफ्रेन्ड आनंद अहुजाची चॉईस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 12:05 IST

सोनम कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा यांची प्रेमकहानी आता बरीच पुढे गेली आहे. बिनधास्त सोनम अलीकडे सर्रास ...

सोनम कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा यांची प्रेमकहानी आता बरीच पुढे गेली आहे. बिनधास्त सोनम अलीकडे सर्रास आनंदसोबत दिसू लागली आहे. खरे तर आनंद अहुजा हा एक परफेक्ट बॉयफ्रेन्ड आहे. होय, अगदी प्रत्येक मुलीला हवा असतो तसा. आम्ही हे कशावरून म्हणतोय. तर आत्तापासून आनंद सोनमची बरीच काळजी घेताना दिसतोय. सोनमने अलीकडे कान्स फिल्म्स फेस्टिवल2017 मध्ये हजेरी लावली. यातील सोनमचे आऊटफिट निवडण्यात आनंदचा मोठा हात होता. आनंदने यात सोनमची बरीच मदत केली. कूल ना?ALSO READ : कान्समधील ऐश्वर्या, दीपिका व सोनमचे काही candid फोटो!!कान्समध्ये सोनमने नेसलेली व्हाईट साडी आठवते? ती आनंद अहुजाची चॉईस होती. यासाठी आनंदनेच सोनम व तिची बहीण रियाला डिझाईनर्स सुचवले होते. आनंदचा स्वत:चा गारमेंट्स बिझनेस आहे. त्यामुळे या डिझाईनर्सला तो चांगल्याप्रकारे ओळखत होता. मग काय, आनंदने त्या डिझाईनर्सची शिफारस केली. सोनम याचमुळे कान्समध्ये  सिम्मा साडीत दिसली. भारतीय डिझाईनर्सला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश होता. आता या साडीत सोनम किती सेक्सी अन् ग्लॅमरस दिसली, हे तुम्ही पाहिलेच. एकंदर काय, तर सोनमसारखीच आनंदची फॅशन टेस्टही जबरदस्त म्हणायला हवी.गेल्या काही दिवसांपासून सोनम व आनंदची जवळीक वाढली आहे. दोघांनीही अनेकदा त्यांच्या रिलेशनशिपबद्दल हिंट दिलीय. यावर्षीचे नववर्षांचे सेलिब्रेशन दोघांनी एकत्र केले होते. सोनमच्या अनेक फॅमिली फंक्शनमध्येही आनंद अलीकडे दिसायला लागला आहे. नुकताच सोनमला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला आनंद हजर होता. यावरून दोघांच्या नात्याची कल्पना यावी.