Join us

OMG!! ​इतका ‘महाग’ आहे करिना कपूरचा मुलगा तैमूर की, प्रोड्यूसरला खर्च पेलवेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 11:49 IST

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात छोटा नवाब तैमूर अली खान दिसणार, अशी एक अफवा पसरली होती. पण आता स्वत: करिनाने ही अफवा धुडकावून लावत तैमूर या चित्रपटात दिसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कारण काय तर...

करिना कपूर सध्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण या बिझी शेड्यूलमध्येही लाडका तैमूर तिच्यासोबत आहे. तैमूरला घेऊन करिना अलीकडे ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटींगसाठी दिल्लीला पोहोचली होती. त्यामुळे या चित्रपटात छोटा नवाब तैमूर अली खान दिसणार, अशी एक अफवा पसरली होती. पण आता स्वत: करिनाने ही अफवा धुडकावून लावत तैमूर या चित्रपटात दिसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कारण काय तर, तर चित्रपटाची निर्माती एकाचवेळी करिना व तैमूर या मायलेकांचा खर्च उचलू शकत नाही म्हणून. आता तुम्हाला हे खरे वाटत नसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ बघायलाच हवा. या व्हिडिओत ‘वीरे दी वेडिंग’ची निर्माती आणि अनिल कपूरची मुलगी रिया कपूर ही सुद्धा दिसतेय.तैमूर ‘वीरे दी वेडिंग’मध्ये दिसणार अशी सगळीकडे चर्चा आहे, हे खरे आहे का? असे करिनाला या व्हिडिओत विचारले जाते. यावर ‘तैमूर तो इस फिल्म में नहीं है, लेकीन उसकी माँ है,’असे उत्तर करिना देते. त्याचवेळी पाठीमागून रिया कपूर ‘ये मेरे बजट से ऊपर है,’ असे ओरडून सांगताना दिसतेयं. मी माझे लूक प्रेक्षकांना दाखवू इच्छिते. पण प्रोड्यूसरला हे मान्य नाही. त्यामुळे मी केवळ स्वत:चा चेहरा दाखवत आहे, असेही करिना या व्हिडिओत म्हणते आहे. एकंदर काय तर हा व्हिडिओ भलताच विनोदी आहे आणि म्हणूनच तो न चुकवण्यासारखा आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहावा आणि तो कसा वाटला ते आम्हाला कळवावे, साहजिक हे सांगायला नकोच.ALSO READ : ​येथे आलिया आहे तर कंगनाही आहे! नेपोटिजमवर पहिल्यांदा बोलली करिना कपूर!!‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना कपूरशिवाय सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यादेखील प्रमुख भूमिकेत आहेत. शशांक घोष दिग्दर्शित हा चित्रपटाचे शूटींग सध्या सुरु आहे. नुकतीच करिना दिल्लीचे एक शेड्यूल पूर्ण करून मुंबईत परतली आहे. पहिल्या शूटींग शेड्यूलसाठी करिना दिल्लीला गेली तेव्हा दहा महिन्यांचा तैमूर तिच्यासोबत होता. अर्थात सेटवरच्या फोटोंमध्ये तैमूर कुठेही दिसला नाही. मात्र एका व्हिडिओत ड्रेसिंग रूममध्ये बसलेली करिना तैमूरला शोधतांना दिसली होती.