Join us  

OMG...! प्रियंका चोप्राच्या घडाळ्याची किंमत ऐकून व्हाल हैराण, या किमतीत तुम्ही घेऊ शकता चार महागड्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 6:00 PM

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा सध्या एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. याचे कारण आहे ते म्हणजे फोटोत प्रियंकाच्या हातात दिसणारे घड्याळ. या घड्याळ्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूकमुळे खूप चर्चेत आहे. रेड कार्पेटवरील प्रियंकाच्या ड्रेस व लूकची जगभरात खूप चर्चा झाली. प्रियंका नेहमी महागडे व ब्रॅण्डेड आऊटफिट्स, बॅग्स व शूज वापरताना पहायला मिळते. प्रियंका बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जिने कमी कालावधीत हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.सध्या प्रियंका कान्समधील लूक व्यतिरिक्त आणखीन एका फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

प्रियंकाचा फोटो तिने घातलेल्या महागड्या घडाळ्यामुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोत तिच्यासोबत नवरा निक जोनसही पहायला मिळतो आहे. यावेळी देसी गर्लने पांढऱ्या रंगाचा स्कर्ट आणि सॅटिन ब्लेजर घातले होते. त्यावर बेज रंगाचे हिल्सही घातले होते आणि पांढऱ्या रंगाची बॅग घेतली होती. याशिवाय तिने सोनेरी रंगाचे घड्याळही घातले होते. तिच्या याच घड्याळाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. चोपर्ड ब्रँडच्या या घड्याळ्यात हिऱ्यांनी सजवण्यात आले आहे. प्रियांकाने या घड्याळाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘Chopard सोबत कान महोत्सवाला जाण्याची हीच वेळ आहे.’

टाइम्सनाऊच्या वृत्तानुसार, प्रियांका चोप्राच्या या घडाळ्याची किंमत जवळपास ३८, २०० CHF एवढी आहे. भारतीय रुपयांप्रमाणे या घड्याळ्याची किंमत २६ लाख ५४ हजार रुपये आहे. तिच्या या एका घड्याळ्यात अनेक महागड्या गाड्या येऊ शकतात.

प्रियांकाच्या वक्रफंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती सोनाली बोसच्या आगामी द स्काय इज पिंक सिनेमात दिसणार आहे.

या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसीमही मुख्य भूमिकेत आहेत. येत्या ११ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास