Join us

OMG : भररस्त्यात ‘या’ व्यक्तीला किस करताना दिसली प्रियंका चोपडा, फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:28 IST

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये आपले जलवे दाखवित आहे. सध्या तिचे काही फोटोज् इंटरनेटवर व्हायरल होत असून, ...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये आपले जलवे दाखवित आहे. सध्या तिचे काही फोटोज् इंटरनेटवर व्हायरल होत असून, ज्यामध्ये ती न्यूयॉर्कमधील रस्त्यावर बिंधास्तपणे एका व्यक्तीला किस करताना दिसत आहे. धक्का बसला ना? पण हा रिअल नव्हे तर रिल लाइफ ड्रामा होता. ज्यामध्ये प्रियंका तिच्या को-स्टारला किस करताना दिसत आहे. प्रियंका सध्या टीव्ही सिरीज ‘क्वांटिको’च्या सीजन-३ची शूटिंग करीत आहे. ज्याच्या एका दृश्यात तिला तिचा को-स्टार एलन पॉवेल याला किस करायचा असतो. याच सीनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रियंका आणि एलन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. प्रियंका डार्क लिपस्टिक आणि मॅचिंग हिलसोबत दिसत आहे, तर एलन पॉवेल ब्लॅक कॅपसोबत कोट पॅण्टमध्ये दिसत आहे. यावेळी दोघेही पॅशनेट लिपलॉक करताना दिसत आहेत. ‘क्वांटिको’च्या नव्या सीजनमध्ये प्रियंका जरबदस्त बोल्ड अवतारात बघावयास मिळणार आहे. त्याची झलक तिच्या या किस सीनमध्ये बघावयास मिळते. दरम्यान, ‘क्वांटिको’चा पहिला सीजन २७ डिसेंबर २०१५ ते १५ मे २०१६ दरम्यान होता. त्यानंतर दुसरा सीजन २५ सप्टेंबर २०१६ पासून सुरू झाला होता. या सीजनचा अखेरचा एपिसोड १५ मे २०१७ ला टेलिकास्ट करण्यात आला होता. दोन्ही सीजनमध्ये २२-२२ एपिसोड दाखविण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार सीजन-३मध्ये केवळ १३ एपिसोडच दाखविण्यात येणार आहेत. ‘क्वांटिको’मध्ये प्रियंका एलेकस पेरिशची भूमिका साकारत आहे. जी एका इनवेस्टिगेटिव एजंशीची आॅफिसर आहे.