OMG!! इंटरनेटवर लिक झाली Padmavati full movie , साडेपाच लाखांवर Views...वाचा संपूर्ण सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:03 IST
प्रखर विरोधानंतर अखेर ‘पद्मावती’ची रिलीज डेट टळली आहे. होय, आता हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होणार नाही. लवकरच या ...
OMG!! इंटरनेटवर लिक झाली Padmavati full movie , साडेपाच लाखांवर Views...वाचा संपूर्ण सत्य!
प्रखर विरोधानंतर अखेर ‘पद्मावती’ची रिलीज डेट टळली आहे. होय, आता हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होणार नाही. लवकरच या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहिर केली जाणार आहे. त्यामुळे तूर्तास या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल काहीही माहिती नाही. पण आता रिलीजपूर्वीच हा चित्रपट इंटरनेटवर लिक झाला, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर?होय, ‘पद्मावती’वरून देशभर रान माजले असतानाच लोक या चित्रपटाला इंटरनेटवर सर्च करू लागले आहेत. सर्च करणा-यांमध्ये गुगल आणि यु-ट्यूबच्या युजर्सची संख्या मोठी आहे. लोकांनी या चित्रपटाला इतके सर्च केले की,गुगलवर ‘पद्मावती’ टाईप करताच टॉप सेकंड सजेशन समोर येते. यासोबत यु-ट्यूबवर Padmavati full movie सर्च करताच एक लिंक समोर येते. यात २ तास ५५ मिनिटांचा एक व्हिडिओ दिसतो. Padmavati full movie आणि Hindi Dubbed 2017 नावाने असलेला हा व्हिडिओ ही बातमी लिहिपर्यंत साडे पाच लाखांवर लोक पाहुन चुकले आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की,Padmavati full movie चा हा व्हिडिओ फेक आहे. खरे तरPadmavati full movie या नावाने यु-ट्यूबवर अनेक फेक व्हिडिओ टाकले गेले आहेत. ALSO READ : १ डिसेंबरला रिलीज होणार नाही ‘पद्मावती’, वाढत्या विरोधामुळे निर्मात्यांनी घेतला निर्णय!तुम्हाला कदाचित माहित असेलच की, रिलीजच्या अनेक महिन्यांनंतरही संबंधित चित्रपट यु-ट्यूबवर टाकला जात नाही. पायरेटेड मुव्हीही यु-ट्यूब डिलिट करतो. त्यामुळे तुम्ही तुमची फसवणुक टाळायला हवी आणि ‘पद्मावती’ असो वा अन्य कुठलाही चित्रपट चित्रपटगृहांत जावूनच बघायला हवा.संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ला गेल्या काही दिवसांपासून राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे. भन्साळीसह अभिनेत्री दीपिका पादुकोणला मारण्याच्या धमक्याही या संघटनांकडून देण्यात आल्या आहेत. त्यातच सेन्सॉर बोर्डाने अद्याप चित्रपटाला सर्टिफिकेट दिले नसल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. सेन्सॉर बोर्डाला दाखवण्याआधी चित्रपटाचे मीडिया स्क्रिनिंग केल्यामुळे सेन्सॉरचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज असल्याचीही चर्चा आहे.