Join us

OMG !!! मनीष पॉल देणार शर्टलेस सीन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 19:37 IST

अँकरचा अभिनेता झालेला मनीष पॉल याच्यावर सध्या तरूणींच्या उड्या पडताहेत.. अहो, का, म्हणून काय?  गत चार महिन्यांत या पठ्ठयाने ...

अँकरचा अभिनेता झालेला मनीष पॉल याच्यावर सध्या तरूणींच्या उड्या पडताहेत.. अहो, का, म्हणून काय?  गत चार महिन्यांत या पठ्ठयाने म्हणे १५ किलो वजन कमी केले..मग काय, त्याची हॉट बॉडी पाहून, कुठलीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल. अलीकडे मनीष अमेरिकेला हॉलीडेवर गेला आणि तिथून वजन वाढून परतला. पण आगामी चित्रपटासाठी हे वजन कमी करणे गरजेचे होते. कारण या चित्रपटात मनीषचे काही शर्टलेस सीन्सही आहेत. त्यामुळेचे मनीषने वजन कमी करण्याचे मनावर घेतले आणि त्यात तो यशस्वीही झाला..मनीष आता जाम खूश आहे आणि त्याच्या इतकाच त्याचा ट्रेनरही खूश आहे. कारण अमेरिकेहून परतल्यावर मनीष जसा त्याच्या ट्रेनरकडे गेला तेव्हा ट्रेनरने डोक्यावर हात मारून घेतला होता. मनीषने हा किस्सा अगदी रंगवून सांगितला. तो म्हणाला. मी अमेरिकेहून सुटी संपवून परतलो आणि माझा ट्रेनर मला पाहून कमालीचा दु:खी झाला. लोकांनी माझ्या पोटाचा घेर पाहून माझ्यावर हसू नये, म्हणून मी कायम सूटबूटमध्ये दिसू लागलो. पण त्यानंतर ट्रेनरने सुचवलेल्या मार्गाने तब्बल १५ किलो वजन कमी केले. कडक डाएट आणि गोड पदार्थ पूर्णत: वर्ज्य केल्यानंतर ही आत्ताची बॉडी मी कमावलीयं. आता मी जाम खूश आहे आणि लवरकच माझ्या आगामी चित्रपटासाठी शर्टलेस सीन्स शूट करणार आहे...