Join us  

OMG ! शूटींगच्या पहिल्याच दिवशी श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने ओढवून घेतला दिग्दर्शकाचा संताप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 9:31 AM

श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा झालीय. केवळ घोषणाचं नाही तर चित्रपटाचे शूटींगही सुरु झालेय. ‘धडक’ ...

श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा झालीय. केवळ घोषणाचं नाही तर चित्रपटाचे शूटींगही सुरु झालेय. ‘धडक’ या चित्रपटातून ती डेब्यू करतेय. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटात शहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत जान्हवीची जोडी जमणार आहे. काल उदयपूर येथे ‘धडक’चे शूटींग सुरु  झाले. पण शूटींगच्या पहिल्याच दिवशी श्रीदेवीच्या लेकीला दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या संतापाचा सामना करावा लागला. होय, फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रा याने ‘धडक’च्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी व ईशांत दोघेही दिग्दर्शकासमोर घाबरलेले दिसत आहेत. शशांक कुठल्या तरी गोष्टीवरून जान्हवी व ईशांत दोघांनाही रागवतोयं,असे या फोटोत दिसते. पण थांबा, तुमचा-आमचा हा अंदाज चुकीचा आहे. होय, जान्हवी व ईशांतला कुणीही रागावलेले नाही. प्रत्यक्षात ईशांत, जान्हवी, शशांक खेतान सगळेच सेटवर मौज मज्जा करत आहेत. तिघांनीही मनीष मल्होत्राला जाणीवपूर्वक ही ‘फन पोज’ दिली आहे. आता जान्हवी व ईशांत ‘फन पोज’ इतकी परफेक्ट देत असतीत तर चित्रपटातील प्रत्येक सीन किती ‘परफेक्ट’ असेल, हे तुम्ही समजू शकताच.ALSO READ : OMG ! शूटींगच्या पहिल्याच दिवशी श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने ओढवून घेतला दिग्दर्शकाचा संताप!!धर्मा प्रॉडक्शननेही शूटींगच्या पहिल्या दिवसाचा फोटो शेअर केला आहे. मुहूर्ताच्या या शॉटमध्ये ईशान ब्ल्यू शर्ट व ग्रे पॅन्टमध्ये दिसतोय तर जान्हवी पिंक कलरच्या सूटमध्ये दिसतेय. उदयपूरच्या एका तलावाच्या किनारी या दोघांनी पाठमोरी पोज दिली आहे. यात दोघांचाही चेहरा दिसत नाही. पण ‘परफेक्ट शॉट ’ असे मात्र हा फोटो पाहून वाटतेय.‘धडक’ हा चित्रपट ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, असे सांगण्यात येतेय. पण ‘धडक’ची कथा ‘सैराट’पेक्षा बरीच वेगळी असेल, असे म्हटले जातेयं. ‘सैराट’ अतिशय साधारण पद्धतीने बनवण्यात आला होता. पण ‘धडक’मध्ये मात्र ग्लॅमरचा तडका लावण्यात येणार आहे. आपल्या मुलीचे ग्रॅण्ड लॉन्चिंग व्हावे, असे श्रीदेवी व बोनी कपूर यांचे मत आहे. त्यामुळेच कदाचित करणने ‘सैराट’च्या स्क्रिप्टमध्ये बरेच बदल केले आहेत.