OMG !! ‘मणिकर्णिका’नंतर कंगना राणौत करणार अॅक्टिंगला बाय-बाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 13:53 IST
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर काल गंगाकाठी रिलीज झाले. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर ...
OMG !! ‘मणिकर्णिका’नंतर कंगना राणौत करणार अॅक्टिंगला बाय-बाय!
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर काल गंगाकाठी रिलीज झाले. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर चित्रपटाच्या २० फुट लांब पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यानंतर कंगनाने जगप्रसिद्ध गंगा आरतीत भाग घेतला. सोबत गंगेत पाच वेळा डुबकी मारत पवित्र स्नान केले. कंगनाच्या गंगाआरतीचे हे फोटो पाहून अनेक चाहते मनोमन सुखावले. पण या चाहत्यांना काहीसे मनातून खट्टू करणारी बातमी आहे. होय, कदाचित ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ हा कंगनाच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असू शकतो. थांबा...थांबा...याबाबत कंगना काय म्हणतेयं, ते आधी ऐकून घ्या.कंगनाच्या मते, ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ सारखा चित्रपट एकदाच बनतो. दुसºयांदा कुणीही असा चित्रपट बनवू शकणार नाही. हा चित्रपट माझ्याकडून चालून आलाय आणि मी त्याला पूर्णपणे न्याय देऊ इच्छिते. यापेक्षा अधिक चांगली स्क्रिप्ट मला मिळावी, असे मी म्हणूनच शकत नाही. कदाचित माझ्या अॅक्टिंग करिअरचा हा शेवटचा सिनेमा असू शकता. हा चित्रपट मला जितका वेळ मागेल, तितका वेळ मी द्यायला तयार आहे, असे कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती.ALSO READ : watch VIDEO : कंगना राणौतने गंगेत डुबकी मारत केले पवित्र स्नान!आता कंगनाच्या अॅक्टिंग करिअरचा शेवटचा सिनेमा म्हटल्यावर तिच्या चाहत्यांना धडकी भरणारच. पण कंगनाने या शब्दांवर ठाम आहे. यावर तिने पुन्हा एकदा खुलासा केला आहे. ती म्हणते, होय, ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ हा कदाचित माझ्या अॅक्टिंग करिअरमधील शेवटचा सिनेमा असेल, असे मी म्हणाले होते. काही असे प्रोजेक्ट असतात, ते तुम्हाला परिपूर्ण करणारे असतात. मी १५ वर्षांची होते. तेव्हा मी आयुष्यात काय मिळवणार, हे मला ठाऊक नव्हते. अगदी मी ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’वर काम सुरु करेपर्यंत मला ही फिलिंग छळत होती. या प्रोजेक्टनंतर आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला मी निघायला हवे, असे मला वाटतेय. एक फिल्ममेकर म्हणून मी काम करायला हवे, अशी माझी इच्छा आहे. मी अॅक्टिंग करेल तर केवळ स्वत:च्याच चित्रपटात करेल. ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’चे दिग्दर्शक कृष यांच्यासोबत मी हीच चर्चा केली. माझा चित्रपट डायरेक्ट करणारे ते अखेरचे डायरेक्टर असतील. मला माहितीयं, माझी ही गोष्ट कुणीच गंभीरपणे घेणार नाही. पण मी स्वत: याबद्दल खूप गंभीर आहे. या चित्रपटानंतर मी दिग्दर्शन करेल, यावर मी ठाम आहे.