OMG : कोणाच्या मांडीवर बसली कंगना राणौत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, यावेळेस कंगना चक्क एका व्यक्तीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. पण ही व्यक्ती कोण असावी?
OMG : कोणाच्या मांडीवर बसली कंगना राणौत!!
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, यावेळेस कंगना चक्क एका व्यक्तीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. पण ही व्यक्ती कोण असावी? कंगना नुकतीच मुंबई येथील महबूब स्टूडिओमध्ये बघावयास मिळाली. कंगना तिच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कदाचित त्याकरिताच ती स्टूडिओमध्ये पोहोचली असावी. मात्र यावेळी जेव्हा तिचे काही फोटोज् समोर आले तेव्हा या फोटोंनी सगळ्यांचेच लक्ष आकर्षित केले आहे. फोटोमध्ये कंगना तिच्या टीममधील एका सदस्याच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. अर्थातच हे फोटो मस्तीच्या मूडमध्ये काढण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कंगनाने अभिनेता हृतिक रोशन आणि त्याचे वडील राकेश रोशन यांच्यावर हल्लाबोल केला होता.