OMG ! हार्दिक पांड्या आणि एली अवरामच्या नात्यात दुरावा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 14:11 IST
गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या अफेअरला घेऊन चर्चेत आहे. कधी हार्दिक एली अवरामला डेट करत असल्याच्या चर्चा ...
OMG ! हार्दिक पांड्या आणि एली अवरामच्या नात्यात दुरावा ?
गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या अफेअरला घेऊन चर्चेत आहे. कधी हार्दिक एली अवरामला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या तर कधी त्याचे नाव उर्वशी रौतेलासोबत जोडण्यात आले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक आणि एलीचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार एली आणि हार्दिकच्या नात्यात दुरावा आला आहे. खरंतर हार्दिक किंवा एली, या दोघांपैकी कोणीही आपलं नातं अधिकृतरित्या स्वीकारले नव्हतं. मात्र अनेक पार्टीच्या ठिकाणी आणि सर्वाजनिक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. हार्दिक आणि एलीच्या नात्यात दुरावा एक अभिनेत्रीमुळे पडल्याची चर्चा आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात हार्दिकच्या भाऊ क्रिकेटपटू कृणाल पांड्याच्या लग्नात एलीने उपस्थिती लावून सगळ्यांचे लक्ष वेधले होते.तेव्हाच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अॅड शूट असो किंवा मॅचसाठी चिअर करणं, एली आणि हार्दिक जागोजागी एकत्र दिसत होते. इतकंच काय, नुकत्याच झालेल्या आयपीएलमधील चेन्नईविरुद्धच्या सामन्यात एली हार्दिकच्या मुंबई इंडियन्स संघासाठी चिअर करायलाही गेली होती. ऐवढेच काय तर जानेवारी भारतीय क्रिकेट टीम साऊथ आफिक्रेच्या दौऱ्यावर असताना एलीसुद्धा त्याठिकाणी गेली होती. साऊथ आफ्रिकेमध्ये पार्टी करताना शिखर धवनच्या बायकोना शेअर केलेल्या फोटोत साऊथ आफ्रिकेमधील फोटोत एली पण दिसली होती त्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले होते.मात्र त्यानंतर आता माशी शिंकल्याचं दिसतेय. एली बिग बॉस या वादग्रस्त शोच्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची आॅफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ या चित्रपटातही बघावयास मिळाली.