Join us  

OMG! ‘लवयात्री’मध्ये पती आयुष शर्मासोबत दिसणार अर्पिता खान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 1:42 PM

‘लवयात्री’ या चित्रपटातून सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. या चित्रपटाबद्दल एक अपडेट आहे.

सुपरस्टार सलमान खानच्या होम प्रॉडक्शनच्या ‘लवरात्रि’ या सिनेमाची घोषणा झाली आणि हा चित्रपट वादात सापडला. चित्रपटाच्या शीर्षकावरून रान माजले. अखेर हा वाद संपवण्यासाठी ऐन रिलीजच्या तोंडावर या चित्रपटाचे ‘लवरात्रि’ हे नाव बदलवून ‘लवयात्री’ असे नवे नामकरण करण्यात आले आहे. या चित्रपटातून सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. या चित्रपटाबद्दल एक अपडेट आहे. होय, ‘लवयात्री’ या चित्रपटात आयुष शर्मासोबत अर्पिता खानही दिसणार आहे. अर्पिता खान या चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू करणार, असे तुम्हाला वाटेल. पण असे नाहीये. ती ना अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय, ना चित्रपटात तिचा कॅमिओ आहे. पण तरिही ती या चित्रपटात ती दिसणार आहे. होय, अर्पिता टॅटूच्या रूपात या चित्रपटात आहे. 

आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. आयुष शर्माने आपल्या डाव्या हातावर अर्पिताच्या नावाचा टॅटू गोंदवला आहे. चित्रपटातही आयुषच्या हातावरचा हा टॅटू दिसणार आहे. खरे तर चित्रपटापुरता आयुषने अर्पिताच्या नावाचा टॅटू लपवणे अपेक्षित होते. पण आयुषने तसा कुठलाही प्रयत्न न करता तो दाखवला. आहे ना मजेशीर...अर्पिता व आयुष यांनी २०१४ मध्ये लग्न केले. दोघांचा आहिल नावाचा एक मुलगा आहे.सलमान खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणा-्या या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मीनावालाने केलेय. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवयात्री’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. वरीना हुसैन ही सुद्धा अभिनेत्री या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. वरिना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही ब-्याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा आहे. आयुषयात गरबा टीचरची भूमिका साकारणार आहे.

 

टॅग्स :आयुष शर्मासलमान खान