OMG : आलिया भट्टच्या हाती लागले तीन मोठ्या बॅनरचे चित्रपट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:02 IST
चुलबुली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता आलियाच्या हाती मोठे तीन चित्रपट ...
OMG : आलिया भट्टच्या हाती लागले तीन मोठ्या बॅनरचे चित्रपट !
चुलबुली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता आलियाच्या हाती मोठे तीन चित्रपट लागले असते. पहिला चित्रपट आहे मेघना गुलजारचा राजी दुसरा चित्रपट आहे ड्रगन आणि तिसरा चित्रपट आहे गली बॉय. चित्रपट राजीमध्ये पहिल्यांदा आलिया एका कश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. याचित्रपटात विक्की कौशल तिच्या अपोझिट दिसणार आहे. ड्रगनमध्ये पाहिल्यांदा रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी जमणार आहे. जोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय चित्रपटात ही आलियासाठी तसा खासच आहे कारण यात पहिल्यांदा ती रणवीर सिंगसोबत काम करणार आहे. येणार वर्षात आलियाचा बोलबाल असणार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ALSO RAED : आलिया भट्टच्या चाहत्यांना मिळणार एक सरप्राईज! वाचा, सविस्तर!!आलिया भट्टच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आणखीन एक खूषखबर आहे. डिएनएच्या रिपोर्टनुसार आलिया भट्टच्या हाताला आणखीन मोठ्या बॅनरचा एक चित्रपट लागला आहे. अश्विनी अय्यरने तिच्या आगामी चित्रपटासाठी आलिया भट्टला अप्रोच केल्याचे कळतेय. अश्विनीला आपल्या चित्रपटात आलिया भट्टला साईन करायचे आहे. दोघांचे या यासंदर्भात मीटिंगसुद्धा झाली आहे. सध्या आलिया तिच्या राजी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आलिया याचित्रपटाला घेऊन खूपच उत्सुक आहे. यात आलियाचे लग्न एका पाकिस्तानी आर्मी ऑफिसरशी होते. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे. अश्विनीचा काही दिवसांपूर्वीत बरेली की बर्फी हा चित्रपट रिलीज झाला आहे. जो गेल्या तीन आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावतोय. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटातकडून ही अपेक्षा आहेत.