Join us

‘काहिरा’मध्ये ओम शांती ओम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:59 IST

फराह खानचा खुलासा२00७ मध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक फराह खान यांचा सुपरहिट चित्रपट 'ओम शांती ओम' ३७ व्या काहिरा ...

फराह खानचा खुलासा२00७ मध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक फराह खान यांचा सुपरहिट चित्रपट 'ओम शांती ओम' ३७ व्या काहिरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यात येणार आहे. फराह खानने चित्रपटाविषयी एक खुलासा केला की, ती या टायटल साँगसाठी अमिताभ, दिलीप कुमार आणि सारा बानो यांना घेणार होती. शाहरूख-दीपिका स्टारर हा चित्रपट फराहसाठी खुपच स्पेशल आहे. कारण जेव्हा शूटिंग सुरू होती. तेव्हा ती प्रेगनेंट होती. तेव्हा ती म्हणाली,' मला अमिताभ बच्चन, आमिर खान सारखे इंडस्ट्रीच्या सेलिब्रिटींना घेण्याची इच्छा होती. तेव्हा शाहरूख म्हणाला,' दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना आपण तयार करू. आता आठ वर्षे झाली पण अजून त्यांना एकत्र आणू शकले नाही. खरंतर या गाण्यासाठी तब्बल ३0 पेक्षा जास्त बॉलीवूडचे तारे दिसले.