Join us  

शूटिंगसाठी नियम-अटीत बदल, तरीही ज्येष्ठ कलाकरांना शूटिंगसाठी सेटवर नो-एंट्रीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:28 AM

६० वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना कोरोना प्रादुर्भावाचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव बघता ज्येष्ठ कलाकारांना आणखी काही दिवस लाईटस, कॅमेरा, अॅक्शनसाठी वाटच बघावी लागणार असेच दिसतंय

कोरोनाच्या प्रार्दुभावाने गेले तीन महिने सर्व काही ठप्प होतं पण आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत आणि आखून दिलेल्या नियमांचं पालन करून मालिकांचं चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगीसुद्धा निर्मात्यांना मिळाली आहे. याचं पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे योग्य पालन करत चित्रीकरणाला सुरूवातही करण्यात आली आहे. नियम-अटीत बदल करुन नवा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यातही ज्येष्ठ कलावंतांना सेटवर परवानगीच नसल्याचे नमुद करण्यात आले आहे.  नव्या अध्यादेशानुसार ज्येष्ट कलाकारांना घरीच आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांची प्रतिकार प्रणाली कमी आहे त्यांच्यावर ह्याचा जास्त परिणाम झालेला आढळतो.  

६० वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना कोरोना प्रादुर्भावाचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव बघता ज्येष्ठ कलाकारांना आणखी काही दिवस लाईटस, कॅमेरा, अॅक्शनसाठी वाटच बघावी लागणार असेच दिसतंय. 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर यायला परवानगी मिळावी अशीही विनंती करण्यात आली होती. निर्मात्यांच्या असोसिएशनसह अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही ही मागणी केली होती. परंतु, वयाबाबत केंद्राकडूनच मार्गदर्शत तत्वे आल्याने त्यात बदल न करता ती अट तशीच ठेवण्यात आली आहे.

हिंदीसोबत मराठी कलाकारांचाही यात समावेश आहे. यात समावेश होतो दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रवी पटवर्धन, अरूण नलावडे, शिवाजी साटम, सतीश आळेकर आदी मान्यवरांचा. अर्थात ही बात केवळ कलाकारांची नाही. तर यात दिग्दर्शक, लेखकही समील आहेत,. दिग्दर्शक डेव्हिड धवन, अनिल शर्मा, सुभाष घई, महेश भट्ट, मणिरत्नम, प्रकाश झा, श्याम बेनेगल, विधूविनोद चोप्रा, प्रियदर्शन, गुलजार, शेखर कपूर, जावेद अख्तर आदींना चित्रिकरण करता येणारं नाही. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या