Join us  

नुसरत जहां यांचं विवाहित आयुष्य आहे अडचणीत? यश दासगुप्ताला करतेय डेट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 2:25 PM

बंगाली चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी गेल्या वर्शी निखिल जैनसोबत लग्न केलं.

बंगाली चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी गेल्या वर्शी निखिल जैनसोबत लग्न केलं. पण त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीही ठीक नसल्यासारखे दिसते आहे. असं म्हटलं जात आहे की नुसरत आणि बांगला अभिनेता यश दासगुप्ता यांच्यातील जवळीक जरा वाढली  आहे. अलीकडे दोघेही एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी राजस्थानला गेले आहेत. या विषयावर नुसरत आणि यश दोघांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

माझं पर्सनल आयुष्य आहे- नुसरतनुसरत आणि निखिल जैन यांचं रिलेशनशीप गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान, नुसरत यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, त्यांच्या पर्सनल लाईफबाबत सार्वजनिकपणे बोलू नये. त्या म्हणाल्या की, लोक त्यांना नेहमीच करतात म्हणूनच त्यांना या विषयावर बोलायचे नाही.

'चांगले की वाईट, हे माझे वैयक्तिक आयुष्य'नुसरत यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे नाही. चांगले किंवा वाईट हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्यांना याबद्दल बोलण्याची इच्छा नाही असे नुसरत यांनी स्पष्टपणे सांगितले.

यशची आली प्रतिक्रिया नुसरत यांच्या बरोबरच्या नात्यावर आपली प्रतिक्रिया देताना यशने म्हटले आहे की, नुसरत यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे ते माहित नाही. राजस्थानमध्ये कोणीही फिरायला जाऊ शकते असे यश म्हणाला, परंतु जर ते नुसरतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असेल तर ते त्यांनाच विचारले जावे.

टॅग्स :नुसरत जहाँ