Join us  

अबब.... नोरा फतेहीच्या डान्सिंग व्हिडीओने सोशल मीडियावर लावली आग, 2 तासांतच 10 लाखाहून अधिक लोकांना पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 7:09 PM

नोरा फतेही नाव घेतेच त्याचे आत्तापर्यंतच सर्च सुपरहिट आयटम साँग डोळ्यासमोर येतात. इन्स्टाग्रामवरही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

नोरा फतेही एक जबरदस्त डान्सर आहे. ती नृत्यासाठी खूप मेहनत घेते आणि सर्धाधिक ती अभिनयापेक्षा डान्समुळेच जास्त प्रसिद्ध आहे. तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. तिच्या डान्सिंग व्हिडीओजना चाहत्यांची भरघोस पसंती मिळते. दरम्यान नोराचा आणखी एक  डान्स व्हिडिओ समोर आला आहे. 

 

नोरा फतेही नाव घेतेच त्याचे आत्तापर्यंतच सर्च सुपरहिट आयटम साँग डोळ्यासमोर येतात. इन्स्टाग्रामवरही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नोरा बीचवर मनमुराद डान्स करताना पाहायला मिळते. नोराच्या डान्समुव्हज पाहून चाहतेही फुल ऑन फिदा आहेत. तिचा हा व्हिडीओ वारंवार पाहिला जात आहे. 

'सत्यमेव जयते' सिनेमात नोरा फतेहीने सुष्मिता सेनचा सुपरहिट 'दिलबर गाण्याच्या रिक्रेअट व्हर्जनमध्ये डान्स केला होता. हे गाणेही प्रचंड हिट ठरले.रसिकांनीही गाण्याचे आणि नोराचे खूप कौतुक केले.यानंतर नोराने अनेक  सिनेमांमध्ये आयटम डान्स केले आहेत.अलीकडेच ती 'इंडियाज बेस्ट डान्सर्स' रिअॅलिटी शोमध्ये देखील गेली होती.शोमधील स्पर्धक नोराचे फॅन होते त्यात परीक्षक आणि डान्स कोरिओग्राफर टेरेन्स लुईसदेखील दीवाना झाला आहे. दोघांना शोमध्ये एकमेकांच्या नावानं चिडवले जाते.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये दिसणार आहे. याशिवाय नोराने आतापर्यंत 'दिलबर', 'कमरिया', 'गर्मी', 'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' या गाण्यावर थिरकून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

टॅग्स :नोरा फतेही