Join us  

No Western But Hotness Overloaded! लाल रंगाच्या साडीतही बोल्ड दिसली मलायका अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 6:00 AM

मलायकाच्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटात दिसली नसली तरी ती तिच्या फिटनेस व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे बऱ्याचदा चर्चेत येते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांना चांगलंच क्लीन बोल्ड केलं आहे. नुकतेच तिने व अर्जुनने अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी मलायकाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. या साडीत ती खूप बोल्ड दिसत होती. 

मलायका अरोराने अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत परिधान केलेल्या लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे आणि तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच स्टनिंग व बोल्ड दिसते आहे. तिची साडी सिम्पल असली त्यावर तिने क्लीवेज दाखवणारा ब्लाऊज त्यावर घातला आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचा या रिसेप्शन पार्टीतील गेटअपमध्ये खूप छान दिसत होते. दोघांनी कॉन्ट्रास्ट रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.  अर्जुन कपूर ग्रीन शेरवानीमध्ये दिसला. 

अर्जुन कपूर व मलायका एकमेकांना बऱ्याच कालावधीपासून डेट करत आहेत. असं बोललं जातंय की ते दोघं लवकरच लग्न करू शकतात. अरबाज खान सोबत विभक्त झाल्यानंतर मलायका व अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त समोर आले होते.

 बराच काळ त्या दोघांनी चुप्पी साधली होती. मात्र या वर्षाच्या सुरूवातीला दोघांनी ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे जगजाहीर केले.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अर्जुन कपूर लवकरच रकुल प्रीतसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. मलायका रुपेरी पडद्यापासून दूर असली तर टेलिव्हिजनवरील काही शोजमध्ये दिसते.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर