Join us  

लॉकडाऊन दरम्यान शेअर केला प्रिया बापटने नो- मेकअप लूक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 4:38 PM

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.

प्रियाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा नो- मूकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. प्रियाच्या या फोटोवरुन ती नुकतेच योग किंवा वर्कआऊट केल्याचे लक्षात येतेय. यात प्रियाच्या चेहऱ्यावर हास्य दिसतेय.  प्रियाच्या फॅन्सना नो- मेकअप लूकमधील तिचा फोटो आवडला आहे. प्रियाने या फोटोसोबत क्वारांटाईन, वर्कआऊट, फिटनेस, स्टे होम, स्टे सेफ अशा हॅशटॅग दिले आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्यपासून सेलिब्रेटींपर्यंत सगळ्यांच स्वत:ला होम क्वारांटाईन करुन घेतले आहे. 

टॅग्स :प्रिया बापट