Join us

एक्स-गर्लफ्रेन्डसोबत सलमान खानने केली ‘न्यू ईअर’ पार्टी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 14:23 IST

देशभर नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले गेले. बॉलिवूडच्या स्टार्सनीही दणक्यात न्यू ईअर सेलिब्रेशन केले. सलमान खानने त्याच्या पणवेलस्थित फार्महाऊसवर न्यू ईअरची जंगी पार्टी दिली.

ठळक मुद्दे 2019 चा डिसेंबर महिना सलमानसाठी अनेकार्थाने खास राहिला.

देशभर नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले गेले. बॉलिवूडच्या स्टार्सनीही दणक्यात न्यू ईअर सेलिब्रेशन केले. सलमान खानने त्याच्या पणवेलस्थित फार्महाऊसवर न्यू ईअरची जंगी पार्टी दिली. या पार्टीचे खास आकर्षण होती, सलमानची एक्स-गर्लफ्रेन्ड संगीता बिजलानी. या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका फोटोत सलमान खान हातात कॉफीचा मग घेऊन दिसतोय.

तर दुस-या फोटोत संगीता बिजलानी, डेजी शाह आणि साजिद नाडियाडवालाची पत्नी वर्धा नाडियाडवाला एन्जॉय करताना दिसत आहेत.

सोहेल खानचा मुलगा निरवान आणि त्याचे काही मित्रही या फोटोत दिसत आहेत. 

सलमान खान डिसेंबर महिन्यात 27 तारखेला वाढदिवस असतो. दरवर्षी पणवेलच्या याच फार्महाऊसवर सलमानच्या वाढदिवसाची पार्टी रंगते. पण यावर्षी सलमानने या पार्टीचा बेत रद्द केला होता. याला कारण म्हणजे, याच दिवशी सलमानची बहीण अर्पिताची प्रसूती होणार होती. वाढदिवसाची पार्टी रद्द झाली पण न्यू ईअरच्या निमित्ताने सलमानची पावले या फार्महाऊसकडे वळलीच.तसे 2019 चा डिसेंबर महिना सलमानसाठी अनेकार्थाने खास राहिला. या महिन्यात त्याचा ‘दबंग 3’ सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने 100 कोटींचा गल्ला जमवला. शिवाय वाढदिवसाच्या दिवशीच सलमान पुन्हा एकदा मामा बनला. सलमानची बहीण अर्पिताने 27 डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव आयत ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :सलमान खान