Join us  

सुशांत सिंग राजपूतच्या मुंबईतील सी फेसिंग घरात येणार नवा भाडोत्री, इतके असेल भाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 8:19 PM

सुशांत सिंग राजपूतने मागील वर्षी १४ जूनला वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याने मागील वर्षी १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांत ज्या अपार्टमेंटमध्ये भाडे तत्त्वावर राहात होता, त्या अपार्टमेंटमध्ये आता नवा भाडोत्री येणार असल्याचे समजते आहे.रियल इस्टेट फर्मने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सुशांतने  २०१९ साली हे घर भाडेतत्त्वावर घेतले होते. या अपार्टमेंटसाठी तो दर महिन्याला साडे चार लाख रूपये मोजत होता. आता सुशांतच्या घरात कोणी दुसरे राहायला येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, हे घर लीजवर देण्यात आले आहे. या घरासाठी आतापर्यंत एकही भाडोत्री आलेला नाही. कोरोनामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी असे सांगितले जात आहे. पूर्वी सुशांत राहात असलेले हे घर समुद्र किनारी आहे. जे लोक मुंबईत कामासाठी येतात, त्यांच्यासाठी हे घर अतिशय आलिशान आहे. 

'व्हेअर द हार्ट इज'च्या एका शोमध्ये सुशांतने त्याच्या घराबद्दल सांगितले. एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सुशांतला घराचे फोटो दाखवण्यात आले. तेव्हा सुशांतला पहिल्या नजरेत हे घर खूप आवडले होते. त्यानंतर त्याने वांद्रे याठिकाणी असलेल्या या आलिशान घरात राहाण्याचा विचार केला. या घरासाठी सुशांतने ३६ महिन्यांचा करार केला होता. 

१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. निधनाला वर्ष झाल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत