Join us  

'तूफान'च्या नव्या पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता, लवकरच ट्रेलर येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 6:47 PM

तुफानच्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

तुफानच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ द्वारा 'तूफान'चा तूफानी ट्रेलर आता 30 जूनला प्रदर्शित होणार आहे. त्या आधी तूफानचे नवे पोस्टर लाँच केले आहे. जे पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे,

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नव्या पोस्टर शेअर करत लिहिले की, तूफान ट्रेलरसाठी उत्सुक असाल तर हात वर करा. 

तूफान चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे करण्यात आली आहे. तूफानचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे, सोबतच मृणाल ठाकुर व परेश रावल यांच्या देखील भूमिका आहेत.

भाग मिल्खा भाग या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफान मधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.

'तूफान' भारतासह 240 देश व प्रदेशांमध्ये 16 जुलै, 2021 ला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

टॅग्स :फरहान अख्तर