new poster : ‘मेरी प्यारी बिंदू’चे नवे पोस्टर आले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 10:38 IST
आयुष्यमान खुराणा आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झालेय.
new poster : ‘मेरी प्यारी बिंदू’चे नवे पोस्टर आले!
आयुष्यमान खुराणा आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झालेय. या पोस्टरमध्ये आयुष्यमान स्वत:चे पुस्तक वाचत असताना दिसतोय. तर परिणीती एकदम कलरफुल लूकमध्ये दिसतेय. तिच्या एका हातात रेकॉर्ड आणि दुसºया हातात माईक दिसतोय. एकंदर काय, तर परिणीती व आयुष्यमानच्या चित्रपटाचे हे पोस्टर प्रेक्षकांची उत्सूकता वाढवणारे आहे. अलीकडे या चित्रपटाचे ‘माना के हम यार नहीं...’ हे गाणे रिलीज करण्यात आले. हे गाणे खुद्द परिणीतीने गायले आहे. या गाण्याद्वारे परिणीती सिंगींग डेब्यू करतेय. हे गाणे रिलीज होताच परिणीतीवर कौतुकाचा एकच वर्षाव होतोयं. ALSO READ : परिणीती चोप्राचे गाणे ऐकून चक्क झोपी गेली ‘गोलमाल4’ टीम!‘मेरी प्यारी बिंदू’ हा चित्रपट अक्षय रॉय याने दिग्दर्शित केलेला आहे. येत्या १२ मे रोजी हा सिनेमा तुमच्या-आमच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात आयुष्यमान अभिमन्यू रॉय ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग कोलकात्यात झाले आहे. निश्चितपणे या चित्रपटाकडून परिणीतीला बºयाच अपेक्षा आहेत. त्यामुळेच चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी परिणीती बरीच मेहनत घेताना दिसते आहे. यात ती एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने गायनाचे रितसर प्रशिक्षण घेतले, प्रॅक्टिस केली आणि गाणे गायिले देखील. एकाच प्रयत्नात ‘माना की हम यार नहीं’ हे गाणे तिने रेकॉर्ड केले. लवकरच परिणीती रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल4’मध्ये दिसणार आहे. सध्या परिणीती ‘गोलमाल’टीमसोबत मस्तपैकी धम्माल करताना दिसतेय. लवकरच ‘गोलमाल4’च्या शूटींगसोबत परिणीती ‘मेरी प्यारी बिंदू’चे प्रमोशन करताना दिसणार आहे. अर्थात तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच. होय ना?