सल्लूमियाँचे नवे डील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 11:43 IST
सुपरस्टार सलमान खान हा सध्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुल्तान’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. त्याचे करिअर, अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि स्क्रिन ...
सल्लूमियाँचे नवे डील!
सुपरस्टार सलमान खान हा सध्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुल्तान’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. त्याचे करिअर, अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि स्क्रिन प्रेझेन्स यांच्यामुळे सल्लूमियाँ संपूर्ण बॉलीवूडचा भाई आहे.‘बिग बॉस ९’ मध्ये आल्यापासून चाहत्यांसोबत त्याचा थेट संपर्क येऊ लागला. आता पुन्हा एकदा त्याने चाहत्यांना भेटायला येण्यासाठी तरतूद केली आहे. त्याने म्हणे आता ‘बिग बॉस १०’ ची डीलही साईन केली आहे.पुन्हा बिग बॉसचे होस्टिंग करायला आता तो तयार झाला आहे. त्याला प्रत्येक एपिसोडला खुप मोठी रक्कम होस्टिंग करण्यासाठी मिळत असते. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ च्या रिलीज होण्याची वाट पाहतो आहे.