चिंपाजीबरोबर व्हिडीओ शेअर करणाºया शिल्पा शेट्टीला नेटिझन्सनी फटकारले, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 21:09 IST
अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुलगा वियानसोबत दुबई ट्रिपवर गेली होती. यादरम्यान शिल्पा आणि वियानने एका प्राणी संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी ...
चिंपाजीबरोबर व्हिडीओ शेअर करणाºया शिल्पा शेट्टीला नेटिझन्सनी फटकारले, पण का?
अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुलगा वियानसोबत दुबई ट्रिपवर गेली होती. यादरम्यान शिल्पा आणि वियानने एका प्राणी संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी शिल्पाची भेट एका चिंपाजीबरोबर झाली. शिल्पाने लगेचच या चिंपाजीला ‘प्रिंसेस’ असे नावही दिले. शिवाय त्याच्यासोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. व्हिडीओमध्ये शिल्पा चिंपाजीबरोबर बघावयास मिळत असून, चिंपाजी शिल्पाला स्माइल देत त्याला किस करताना दिसतो. परंतु हा व्हिडीओ शिल्पाच्या चाहत्यांना फारसा भावला नसल्याचे दिसून आले. त्यांनी शिल्पाच्या या व्हिडीओला अशा काही उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या की, शिल्पाला काही वेळातच हा व्हिडीओ डिलीट करावा लागला. व्हिडीओमध्ये असे दिसत होते की, शिल्पा चिंपाजीबरोबर फुली इंटरअॅक्ट करीत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर शिल्पाच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली. काही चाहत्यांनी तर हा व्हिडीओ आवडला नसल्याचे उघडपणे सांगितले. कारण व्हिडीओमध्ये शिल्पाला जो चिंपाजी स्माइल आणि किस करताना दिसत आहे तो इन्स्ट्रक्टरच्या धमकावण्यावरून करीत आहे. खरं तर या चिंपाजीकडून हे सर्व काही जोर जबरदस्तीने करवून घेतले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. हाच एक धागा पकडून यूजर्सनी शिल्पाला खडेबोल सुनावले. तिच्या व्हिडीओचे समर्थन करणारी एकही कॉमेण्ट मिळाली नसल्याने अखेर शिल्पाला काही वेळातच हा व्हिडीओ डिलीट करावा लागला. शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘हा माझा फेव्हरेट व्हिडीओ आहे. प्रिंसेसला मिस करीत आहे.’ परंतु लोकांनी तिच्या या कॅप्शनला फारशी दाद न देता प्राण्यावरील अत्याचारावरून सुनावले. बºयाच लोकांनी लिहिले की, चिंपाजीची ही रिअॅक्शन खूपच हर्ट करणारी आहे. लोक याकडे मनोरंजनात्मक पद्धतीने बघत असल्याने हे लाजीरवाणे आहे. काहींनी अशीही अपेक्षा व्यक्त केली की, आम्ही अपेक्षा करतो की, ‘या प्राण्यांना प्रेमाने ट्रेंड केले जावे, टॉर्चर करून नव्हे.’