Join us  

Video: ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हे काय? आमिरची पँट पाहून नेटकर्‍यांना हसू आवरेना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:12 AM

Video: व्हिडीओवरच्या कमेंट्स तर इतक्या मजेशीर आहेत की, तुमचंही हसून हसून पोट दुखेल.

ठळक मुद्देकदाचित आमिरनं हा लूक  ‘लाल सिंग चड्ढा’च्या चित्रपटासाठी धारण केला असावा. पण तूर्तास तरी त्याच्या या लुकची चाहते चांगलीच मजा घेत आहेत.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. करिना कपूरही (Kareena Kapoor) चित्रपटाच्या सेटवर परतली आहे. अशात सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून नेटकर्‍यांना हसू आवरत नाहीये. व्हिडीओवरच्या कमेंट्स तर इतक्या मजेशीर आहेत की, तुमचंही हसून हसून पोट दुखेल.या व्हिडीओत आमिरसोबत करिनाही दिसतेय. दोघेही चर्चा करताना दिसत आहेत. करिनाच्या हातात कॉफीचा मग आहे आणि आमिर सांगत असलेल्या गोष्टी ती लक्षपूर्वक ऐकतेय. आता तुम्ही म्हणाल यात मजेशीर काय आहे तर ती म्हणजे आमिरची पँट. होय, व्हिडीओ समोर  आमिरच्या पँटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मग काय, या व्हिडीओवर नेटकर्‍यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्यात.

आमिरनं छातीवर पँट का घातलीय? असा मजेशीर प्रश्न एका युजरनं केला. एका युजरनं यापुढे जात करिना व आमिर काय बोलत असतील, याचं कल्पनाचित्र रंगवलं. आमिर करिनाला म्हणतं असावा की, कॉफी घरून घेऊन येत जा. सेटवर कॉफी मग दाखवून शो ऑफ करण्याची गरज नाही. यावर करिना आमिरला म्हणत असावी की, आधी तू तुझी जीन्स कमरेवर घाल, छातीवर नको....

एका अन्य युजरनं आमिरची चांगलीच मजा घेतली. लालसिंग चड्ढाची टी-शर्टही लाल, असं या युजरनं लिहिलं. एक युजर मात्र आमिरच्या बाजूने मैदानात उतरला. आमिरची पँट पाहून हसणा-यांना हे ठाऊक नाही की, तो या चित्रपटात टॉम हँक्सची भूमिका साकारतोय. कमेंट करण्याआधी हेही माहित करून घ्या, असं त्यानं सुनावलं.कदाचित आमिरनं हा लूक  ‘लाल सिंग चड्ढा’च्या चित्रपटासाठी धारण केला असावा. पण तूर्तास तरी त्याच्या या लुकची चाहते चांगलीच मजा घेत आहेत.

टॅग्स :आमिर खानकरिना कपूर