नेहाचा नवा स्टायलिश अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 21:26 IST
फॅशन आणि नेहा धुपिया हे एकमेकांना पयार्यच म्हणायला हवे. दरवेळी ती आपल्या चाहत्यांसमोर नव्या स्टायलिश लुकमध्ये अवतरते. यामुळेच तिच्या ...
नेहाचा नवा स्टायलिश अंदाज
फॅशन आणि नेहा धुपिया हे एकमेकांना पयार्यच म्हणायला हवे. दरवेळी ती आपल्या चाहत्यांसमोर नव्या स्टायलिश लुकमध्ये अवतरते. यामुळेच तिच्या फॅशन स्टेटमेंट चर्चेचा विषय ठरतो. तिच्या या फॅशन सेन्ची दखल मीडियाने घेतलेली दिसते. लवकरच नेहाचा ‘मोह माया मनी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती न्यूज प्रोड्युसरच्या भूमिकेत दिसेल. अर्थातच नेहा साकारणारी न्यूज प्रोड्युसरही तिच्यासारखीच स्टायलीश असेल. नेहाने आपल्या स्टाईल स्टेमेंटच्या माध्यमातून नवा ट्रेंड रूजविला आहे. ती ज्या व्यवसायात आहे तेथे जर कुणाला आपल्या स्टाईलची पर्वा नसेल व तुम्ही स्टायलिश राहत असाल तर त्यात वावगे काय? कामकाजी महिलांनी कामाच्या ठिकाणी स्टायलिश का राहू नये असा सवाल महिलांना आपल्या नव्या स्टाईलमधून द्यायचा असेल नाही का? ‘मोह माया मनी’मधील नेहाचा अंदाज पाहून कुणालाही तसेच राहवे असे वाटू लागल्यास हरकत नाही कारण तिचा हा लूक सर्वांना आवडेल व तिचे अनुसरण करावे असा वाटणाराच आहे. ‘मोह माया मनी’या चित्रपटामध्ये ती दिव्या नावाच्या न्यूज प्रोड्युसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या कथेला अनुसरून व दिव्याच्या मनात असलल्या भावनांचा उलगडा तिला झाला असेल असेच म्हणायला हवे कारण या भूमिकेसाठी तिने नव्या कपड्यांची मागणी केली नाही. ही भूमिका साकारताना तिने स्वत:च्या कपड्याचा वापर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या स्टाईल स्टेटमेंटला फॅलो करणारे अनेक लोक आहेत हे तिला चांगलेच ठाऊक आहे म्हणूनच तिने या भूमिकेसाठी कपड्यांची निवड स्वत: केली असणार. या चित्रपटामध्ये तिने जे कपडे वापरले आहेत ते अमेरिकेतील एका स्वस्त क पड्यांच्या दुकानातून घेतले असल्याचे ती सांगते.