Join us  

नेहा कक्कड आणि हनी सिंग अडचणीत, 'या' गाण्यामुळे सापडले वादात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 11:26 AM

रॅपर हनी सिंग आणि वाद या ही गोष्ट काही आता नवी नाही. हनी सिंग पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे.

ठळक मुद्देदोघांच्या फॅन्ससाठी थोडीशी वाईट बातमी आहे.

रॅपर हनी सिंग आणि वाद या ही गोष्ट काही आता नवी नाही. हनी सिंग पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. हनी सिंगचे नवं गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतेय. या गाण्यात त्याच्यासोबत नेहा कक्करसुद्धा दिसतेय. हनी सिंग आणि नेहा त्यांचा म्युझिक व्हिडीओ 'मखना'ला घेऊन चर्चेत आहेत. मात्र दोघांच्या फॅन्ससाठी थोडीशी वाईट बातमी आहे. या गाण्यात महिलांबाबत अभद्र आणि अशोभनीय शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंजाबच्या महिला आयोगाने या गाण्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. पंजाबच्या महिला आयोगाच्या मनीषा गुलाटी यांनी ही मागणी केली आहे. मनीषा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून 12 जुलैपर्यंत याबाबतचा रिपोर्ट मागितला आहे. 

मनीष यांनी अधिकाऱ्यांना पत्रात लिहिलेले आहे की, ''टी-सिरीजचे चेअरमन भूषण कुमार आणि हनी सिंग यांच्या गाण्यावर कारवाई करण्यात यावी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या गाण्यात महिलांविषयी अशोभनिय भाषा भाषा वापरली आहे त्यामुळे पोलिसांनी गायकावर आणि संबंधीत कंपनी विरोधात तक्रार दाखल करावी. तसेच त्यांनी या गाण्याला बॅन करण्याची मागणी देखील केली आहे. 

नेहा गेल्या काही महिन्यांपासून तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर काहीकाळ ती डिप्रेशनमध्ये देखील गेली होती. हनी सिंगबाबत बोलायचे झाले तर तो मध्ये काही वर्षे हनी सिंग इंडस्ट्रीतून गायब झाला होता. काहींनी तो अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांने पुन्हा इंडस्ट्रीत  पुनरागमन केले. 

टॅग्स :नेहा कक्करहनी सिंह