Join us

​नेहा धूपिया अशी निवडते मोबाईल, वाईन आणि मित्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 15:59 IST

नेहा धूपिया सध्या चर्चेत आहे, ती तिच्या ‘नो फिल्टर नेहा’ या आॅडिओ शोमुळे. तिचा हा शो भलताच लोकप्रीय झालाय. ...

नेहा धूपिया सध्या चर्चेत आहे, ती तिच्या ‘नो फिल्टर नेहा’ या आॅडिओ शोमुळे. तिचा हा शो भलताच लोकप्रीय झालाय. अर्थात आम्ही या शोबद्द्ल नाही, तर वेगळ्याच एका विषयावर बोलणार आहोत. हा विषय जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असालच. आम्ही आज ज्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, तो विषय आहे, नेहाची चॉईस. होय, मोबाईल, वाईन किंवा एखादे बुक किंवा मेल फ्रेन्ड निवडायचा झाल्यास नेहा कशी निवडते? या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच नेहाची चॉईस जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. मोबाईल, वाइन, बुक किंवा मेल फ्रेन्ड निवडण्याची एक सोपी पद्धत नेहाकडे आहे. अलीकडे  एका सेल फोन लॉन्चला नेहा पोहोचली. यावेळी तिने यासाठी ती वापरत असलेली एक सोपी ट्रिक सांगितले.  कुठलाही पुरुष, मोबाईल आणि वाईन निवडतांना मी केवळ लुक्स बघते, असे ती म्हणाली. आय चूज दी बुक बाई जजिंग इट्स कव्हर. मला कुणीही इंप्रेस करण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याचे लुक्स चांगले असायला हवे. एखादा पुरूष मित्र असो, वाईन असो किंवा एखादे पुस्तक, त्याकडे बघितल्यावर चांगली फिलींग यायला हवी. लुक्स आणि फिलिंग या दोनच गोष्टींच्या आधारावर मी माझा मोबाईल, वाईन आणि मेल फ्रेन्ड निवडते,असे तिने सांगितले.ALSO READ : ​नेहा धुपिया साकारणार छोटे मियाँ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका ‘नो फिल्टर नेहा’ या माझ्या शोला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मी आनंदी आहे. कुठल्याही प्रमोशनशिवाय या शोला इतकी लोकप्रीयता मिळाली आहे, हे माझ्यासाठी कमी नाही, हे सांगायलाही ती विसरली नाही.