Join us

नेहा धुपियाला वाटतंय, सारी कारकीर्द बॉलिवूडमध्ये गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 17:22 IST

१९९४ साली मल्याळम चित्रपट मिन्नारमने चित्रपटक्षेत्रात आलेल्या नेहा धुपियाला आपली सारी कारकीर्द बॉलिवूडमध्ये गेल्याचे वाटतंय.गेल्या दशकभरात बॉलिवूडचा भाग ...

१९९४ साली मल्याळम चित्रपट मिन्नारमने चित्रपटक्षेत्रात आलेल्या नेहा धुपियाला आपली सारी कारकीर्द बॉलिवूडमध्ये गेल्याचे वाटतंय.गेल्या दशकभरात बॉलिवूडचा भाग बनली. यामध्ये तिने अनेक चित्रपट केले. क्या कूल है हम, शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला, चुप चुप के, सिंग इज किंग, कयामत: सिटी अंडर थ्रेट अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेहा म्हणते, हे खरंय गेली अनेक वर्षे या क्षेत्रात आहे, मात्र मला ज्या पद्धतीच्या सिनेमात काम करावयाचे होते, तो करता आला नाही, याची खंत आहे. पाठीमागे पाहताना ही जाणीव होते.’ंनेहा धुपिया सध्या रोडीज रायजिंग या रिअ‍ॅलिटी शोमध्ये गँग लीडर म्हणून काम करीत आहे. नेहा म्हणते, ‘प्रेक्षकांना अधिक आवडेल अशा प्रकारच्या सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. अर्थातच अधिकाधिक लोकांनी आपला सिनेमा पहावा असे वाटते, परंतु कधी कधी निराशा येते. ज्यावेळी एक चालीस की लास्ट लोकल अशा किंवा इतर चित्रपटात काम करताना त्यावेळी प्रेक्षक तयार नसतात आणि ज्या वेळेस ते तयार असतात, त्यावेळी मला तशा पद्धतीच्या आॅफर्स येत नाहीत.’‘माझी हयात या क्षेत्रात गेली. गेली १३ वर्षे मी क्षेत्रात असून, मला याचा खरोखरीच अभिमान वाटतो. मला कोणतेही दु:ख नाही. ज्या पद्धतीने काम सुरू आहे, ते उत्तम आहे. मी अशाच पद्धतीने काम करीन. मी नक्कीच आनंदी आहे. या क्षणी मी कोणतेही काम करीत नाही, तरीही मी आनंदी आहे.२०१६ साली नेहाने मोह माया मनी या चित्रपटात काम केले होते. छोटे मियाँ या शोमध्येही तिने काम केले.