Join us  

नीतू कपूर यांना सूनबाईचं कौतुक, बेस्ट अभिनेत्री ठरल्यानंतर आलियासाठी केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 10:54 AM

69th National Film Awards : आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्ड मिळाल्यानंतर नीतू कपूर यांनी तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची गुरुवारी(२४ ऑगस्ट) घोषणा करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला यंदाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी आलियाला हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत आहे. तिने गंगुबाईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील आलियाने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं.

आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आलियाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सूनबाईचं कौतुक केलं आहे. “आलिया तुझ्यावर खूप गर्व आहे. पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुझं अभिनंदन”, असं नीतू कपूर यांनी आलियासाठी खास पोस्ट केली आहे. आलियाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडियावरही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आलियाबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉननेही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारावर नाव कोरलं. ‘मिमी’ या सिनेमासाठी क्रितीला हा पुरस्कार मिळाला. ‘पुष्पा’ चित्रपटातील भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं.

दरम्यान, आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट फेब्रुवारी २०२२मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. संजय लीला भन्साळींनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आलियाबरोबरच या चित्रपटात अजय देवगण, शंतनु महेश्वरी, हुमा कुरेशी, विजय राज या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :आलिया भटनितू सिंगराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018बॉलिवूड