Join us  

लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 4:37 PM

Neetu kapoor: हा व्हिडीओ पाहिल्यावर लग्न झाल्यावर लगेचच अलियाने सासूबाईंना आपल्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली, अशी मजेदार कमेंट नेटकरी करत आहेत.

बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून आलिया भट्ट (alia bhat)आणि रणबीर कपूरकडे (ranbir kapoor) पाहिलं जातं. नुकतीच १४ तारखेला या जोडीने लग्नगाठ बांधली त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या जोडीची चर्चा आहे. या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओदेखील सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. यात नीतू कपूर (neetu kapoor) यांचा एक व्हिडीओ कमालीचा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लग्न झाल्यावर लगेचच अलियाने सासूबाईंना आपल्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली, अशी मजेदार कमेंट नेटकरी करत आहेत.

कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या दिग्दर्शक करण जोहरसोबत डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ हुनरबाज या शोच्या ग्रँड फिनालेचा आहे. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नीतू कपूर गंगुबाई काठियावाडी या चित्रपटातील ढोलिडा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं आलियावर चित्रीत करण्यात आलं आहे. त्यामुळे आलियाच्या गाण्यावर सासूबाईंना धमाकेदार केल्यानंतर अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, याच मंचावर नीतू कपूर यांना सुनबाई आलियाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी घरात फक्त सुनेचं राज्य असावं असं प्रामाणिकपणे त्यांनी मत मांडलं. त्यामुळे त्यांच्या या गोड स्वभावाचीही सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठनितू सिंगआलिया भट