नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर मागितले काम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 10:33 IST
नीना गुप्ता या नावाला कुठल्याही विशेषणाची गरज नाही. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री यापलीकडे एक प्रतिभावान अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. ...
नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर मागितले काम!!
नीना गुप्ता या नावाला कुठल्याही विशेषणाची गरज नाही. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री यापलीकडे एक प्रतिभावान अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. आपल्या प्रगल्भ अभिनयासाठी ओळखल्या जाणाºया नीना गुप्ता दीर्घकाळापासून पडद्यावर दिसलेल्या नाहीत. पण अचानक नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत. होय, नीना यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि बघता बघता त्यांची ही पोस्ट इंटरनेटवर व्हायरल झाली. ‘मी मुंबईत राहते आणि काम करते. मी एक प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि एका दमदार भूमिकेच्या शोधात आहे, ’ असे त्यांनी लिहिले. या पोस्टसोबत स्वत:चा एक फोटोही शेअर केला. नीना गुप्ता यांची ही पोस्ट अनेकांसाठी प्रेरक ठरली.नीना यांची ही पोस्ट त्यांची मुलगी मसाबाने तिच्या अकाऊंटवरून शेअर केली. शिवाय आईबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ‘मला काम मागायला ना लाज वाटते, ना भीती, असे मी काही दिवसांपूर्वीच कुणाला तरी म्हणाले होते. आई काम मागत असेल तर निश्चितपणे हे ‘खानदानी’ म्हणायला हवे. माझ्या आईने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेती माझी ६२ वर्षीय आई. ती कायम मला प्रेरणा देत आलीय. काम तुम्हाला म्हातारे होण्यापासून रोखते, असे ती मला नेहमीच सांगत आलीय. माझ्या आईसारखे काम कुणीच करू शकत नाही. ती पीआर करू शकत नाही. तिच्यामते, तिचे काम हाच तिचा पीआर आहे. हे जग माझ्या आईची प्रतिभा नाकारू शकत नाही, ’असे मसाबाने लिहिले आहे.आईबद्दल मसाबाने लिहिलेली ही पोस्ट बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिलाही आवडली. प्रेरक पोस्ट, असे प्रियांकाने लिहिले. केवळ प्रियांकाच नाही तर अनेकांनी नीना गुप्ता व मसाबा यांच्या पोस्टला दाद दिली.नीना गुप्ता यांनी ‘खलनायक’,‘जाने भी दो यारों’,‘कमजोर कडी’ आणि ‘गांधी’ यासारख्या चित्रपटांत काम केले आहे. शिवाय छोटा पडदाही गाजवला आहे.