Join us  

निसर्गाच्या सानिध्यात नीलम कोठारी एन्जॉय करते फॅमिली टाईम, पाहा तिचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 6:00 AM

शाळेलाही सुट्टी लागल्यामुळे, आम्हांला आमचा असा परफेक्ट फॅमिली वेळ पुण्यातील मुळशी लेक इथल्या रिसॉर्टच्या परिसरात एन्जॉय करताना दिसली.

भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. त्यातच कोरोनामुळे सारेच घरात बंदिस्त झाले होते. आता हळूहळू सगळंच पूर्ववत होत असल्यामुळे सेलिब्रेटीदेखील घराबाहेर पडत निवांत क्षण एन्जॉय करताना दिसतायेत. 

 

 ८० आणि ९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्रींपैकी नीलम कोठारीनेदेखील तिच्या फॅमिलीसोबत असाच खास प्लॅन बनवला होता. आठ वर्षांची मुलगी आहानासोबत घरापासून लांब जरा शांत आणि क्वालिटी फॅमिली टाईम तिने एन्जॉय केला. शाळेलाही सुट्टी लागल्यामुळे, आम्हांला आमचा असा परफेक्ट फॅमिली वेळ पुण्यातील मुळशी लेक इथल्या रिसॉर्टच्या परिसरात एन्जॉय करता आल्याचे तिने सांगितले.

रिसॉर्टचा प्लॅन समीरने सुचवला आणि विशेष म्हणजे या रिसॉर्टमध्ये लहान मुलांसाठी शिबिरचेही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कूकिंग, बागकाम, ट्रेंकिंगचे वर्ग आणि अशा ब-याच गोष्टी शिकवण्यात येतात. म्हणून आम्हांला वाटले की एकंदरित हे सर्व आमच्यासाठी आणि विशेष करुन आहानासाठी एक वेगळा अनुभव असेल”, असं नीलमने म्हटले. साथीच्या आजारामुळे सर्वत्र तणावाचं, चिंताग्रस्त आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं त्यामुळे सतत तोच-तोच विचार करुन स्ट्रेस यायचा. निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रसन्न वाटलं, मनाला शांतता लाभली असल्याचे तिने म्हटलंय.  

तणावग्रस्त वातावरणातून दूर जाणे हे कधीकधी महत्त्वाचे असते. सिटी लाईफ खूप बदलली आहे. आपण सहजपणे बाहेर जाऊ शकत नाही, लोकांना भेटायला घाबरतोय. त्यामुळे मला असं वाटतंय की, सध्याच्या भीतीपासून जरा दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात, हिरवळ जागेत, आनंदी वातावरणात जाणे हे आपल्या मनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.