Join us

‘साहो’मध्ये खलनायक साकारणाऱ्या नील नितीन मुकेशने ‘बाहुबली’ प्रभासविषयी केले ‘हे’ वक्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 14:47 IST

तेलगू इंडस्ट्रीमध्ये बिग बजेट ‘साहो’ या चित्रपटातून पाउल ठेवणारा बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश सध्या ‘बाहुबली’ प्रभाससोबत काम करताना ...

तेलगू इंडस्ट्रीमध्ये बिग बजेट ‘साहो’ या चित्रपटातून पाउल ठेवणारा बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश सध्या ‘बाहुबली’ प्रभाससोबत काम करताना चांगलाच हरकून गेला आहे. तो प्रभासचे कौतुक करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्याने शुक्रवारी एक ट्विटच्या माध्यमातून ‘फिरकी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला जात असल्याचे सांगितले. नीलने लिहिले की, ‘लंडनला परत जात आहे. हैदराबाद नेहमीप्रमाणेच सुंदर आहे. ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव खूपच चांगला राहिला आहे. टीमसोबत काम करण्यासाठी मी उत्साहित आहे.’ नील ‘साहो’मध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे. यावेळी नीलने सहकारी कलाकार प्रभास आणि श्रद्धा कपूरचेही कौतुक केले. नीलने ट्विटमध्ये लिहिले की, ‘श्रद्धादेखील याच चित्रपटात तेलगू इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करीत आहे. प्रभासविषयी नीलने लिहिले की, ‘प्रभास खूपच चांगला आणि प्रिय व्यक्ती आहे. मी त्याला चित्रपटाच्या सेटवर भेटण्यास उत्सुक आहे. चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी आणि अरुण विजय बघावयास मिळणार आहेत. वास्तविक चित्रपटात नीलच खलनायकाच्या भूमिकेत नाही तर जॅकी श्रॉफही खलनायक साकारताना दिसणार आहेत. सध्या नीलने त्याच्या वाट्याचे शूटिंग पूर्ण केले असून, तो त्याच्या इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला आहे, तर प्रभास आणि श्रद्धा सध्या ‘साहो’चे शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रद्धा चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. परंतु प्रभासच्या चाहत्यांना आतापासूनच चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.