Join us

‘मुन्ना मायकल’मधील नवाजुद्दीन सिद्दिकीचा खतरनाक लुक रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 14:07 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मात्र, यावेळची त्याची ही नकारात्मक भूमिका आतापर्यंतच्या भूमिकेच्या ...

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मात्र, यावेळची त्याची ही नकारात्मक भूमिका आतापर्यंतच्या भूमिकेच्या तुलनेत खूपच खतरनाक असल्याने प्रेक्षक नवाजुद्दीनचा हा अंदाज बघून दंग राहतील, यात शंका नाही. आगामी ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात तो अभिनेता टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवालबरोबर काम करणार आहे. या चित्रपटात नवाज एका गॅँगस्टरची भूमिका साकारत असून, त्याला मुन्नाप्रमाणे डान्स करण्याची इच्छा असते. खरं तर टायगर श्रॉफच्या या चित्रपटाने आतापर्यंत प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पडद्यावर केव्हा येईल, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे. वास्तविक नवाजने आतापर्यंतच्या त्याच्या बºयाचशा चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. मात्र यावेळची त्याची ही भूमिका स्पेशल असणार आहे. यावेळी तो इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध डान्सर टायगर श्रॉफसोबत थिरकताना दिसणार आहे. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटात टायगर डान्स लेजेंड मायकल जॅक्सनला ट्रिब्यूट देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट निर्माते चित्रपटातील प्रत्येक पात्राचे लुक रिलीज करीत आहेत. अगोदर टायगर श्रॉफ नंतर निधी अग्रवाल अन् आता नवाजुद्दीनचा लुक रिलीज करण्यात आला आहे. नवाजचा लुक बघून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, तो या चित्रपटात काही तरी धमाका करणार आहे. जर त्याच्या या लुकचे बारकाईने निरीक्षण केल्यास नवाजच्या हातात दोन चमकणारे बॉल दिसत आहेत. शिवाय चेहºयावरील हास्य व डोळ्यातील अंदाज काही तरी वेगळीच कथा सांगून जाते. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात टायगर श्रॉफ आणि साबिरची जोडी पुन्हा एकदा परतली आहे. या अगोदर या दोघांनी ‘बागी’ आणि ‘हिरोपंती’ या चित्रपटात काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून साबिरने आतापर्यंत जेव्हा-जेव्हा टायगरसोबत काम केले तेव्हा तो चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी राहिला आहे. त्यामुळे यशाचे सूत्र याही चित्रपटाबाबत कायम राहणार, असे बोलले जात आहे.