Join us  

66th National Film Awards 2019: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर; ‘भोंगा’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:34 PM

संपूर्ण भारतीय कलाविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत मानाच्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ‘भोंगा’ हा  सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे.

संपूर्ण भारतीय कलाविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत मानाच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’ हा  सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे.  तर आयुष्यमान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे.

मराठीची बाजीगतवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ या मराठी चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ’  याच चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या(चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे. 

अंदाधुन, उरीचा दबदबाहिंदी चित्रपटांमध्ये ‘अंधाधुन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अंधाधुन’चा अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा विकी कौशल या दोघांना  सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’साठी दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. ‘पॅडमॅन’ हा अक्षय कुमार स्टारर चित्रपट सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून ‘बधाई हो’ने सर्वोत्कृष्ट  लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्यात या पुरस्कारांची घोषणा होते. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी एक समिती नेमण्यात येते ज्यामध्ये नि:पक्षपातीपणाने विजेते निवडले जातात. या समितीममध्ये नावाजलेले चित्रपट निर्माते,दिग्दर्शक आणि कलाविश्वातील काही चेह-यांचा समावेश असतो. या पुरस्कारांमध्ये चित्रपटांना प्रोत्साहित करणा-या राज्याचाही सन्मान करण्यात येतो.

 

जाहीर झालेले राष्ट्रीय पुरस्कार-

सर्वोत्कृष्ट चित्रपट - इल्लारू (गुजराती)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा

सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट - टर्टल

सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट- हमीद

सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- नायजेरिया

सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट- महान्ती

सर्वोत्कृष्ट तमीळ चित्रपट -बाराम

सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- बिलबुल कॅन सिंग

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट- हारजीता

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन-  कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी

सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- केजीएफ

 सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो

सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

पर्यावर संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)

सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018