Join us  

राष्ट्रीय पुरस्कार विजेती दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश दिसते एखाद्या बॉलिवूड अभिनेत्री इतकीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 11:33 AM

कालच्या पुरस्कारानंतर किर्ती हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. ही किर्ती कोण आहे हे जाणून घ्यायची सगळ्यांची इच्छा आहे.

ठळक मुद्देकिर्ती सुरेश गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत असून तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा केली जाते.

काल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विकी कौशलला उरीः द सर्जिकल स्ट्राईक आणि आयुषमान खुराणाला अंधाधुन या चित्रपटासाठी मिळाला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने किर्ती सुरेशला सन्मानित करण्यात आले. कालच्या पुरस्कारानंतर किर्ती हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. ही किर्ती कोण आहे हे जाणून घ्यायची सगळ्यांची इच्छा आहे. किर्ती सुरेश गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत असून तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा केली जाते.

किर्तीला महांती या तेलुगू चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून तिने या चित्रपटात महांती ही मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात तिच्यासोबतच दलकीर सलमान, शालिनी पांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

किर्ती सुरेश ही अभिनेत्री दाक्षिणात्य इंडस्ट्रीत अतिशय प्रसिद्ध असून तिने तेलगू, तमीळ आणि मल्याळम या तिन्ही भाषांमध्ये काम केले आहे. तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या अभिनयाचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा केली जाते.

किर्ती तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिचे नेहमीच फोटो पोस्ट करत असते. त्यातील किर्तीचे अनेक फोटो हे आपल्याला भारतीय पेहरावात पाहायला मिळतात. वेस्टर्न कपड्यांमध्ये तिचे खूपच कमी फोटो सोशल मीडियावर दिसून येतात. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर ३३ लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

किर्तीचे आई-वडील दोघेही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अतिशय प्रसिद्ध असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत तिने या क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिनेत्री मेनका आणि निर्माते सुरेश कुमार यांची किर्ती ही मुलगी असून तिने वयाच्या आठव्या वर्षापासून अभिनय करायला सुरुवात केली आहे. २०१३ ला प्रदर्शित झालेल्या गितांजली या मल्याळम चित्रपटात पहिल्यांदाच ती नायिकेच्या भूमिकेत झळकली. अभिनेत्री असण्यासोबतच तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. 

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018