Join us

नर्गिसची टॉप टेन स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:37 IST

नर्गिसची टॉप टेन स्टोरीबोल्ड, ब्यूटीफुल अँण्ड सेक्सी नर्गिस फाक्रीची स्तुती करावी तितकी कमी आहे. नवोदित असूनही आणि व्यवस्थित ...

नर्गिसची टॉप टेन स्टोरीबोल्ड, ब्यूटीफुल अँण्ड सेक्सी नर्गिस फाक्रीची स्तुती करावी तितकी कमी आहे. नवोदित असूनही आणि व्यवस्थित हिंदी बोलता येत नसूनही तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अशा या प्रतिभावान नर्गिसच्या या टॉप टेन गोष्टी..1. नर्गिस न्यूयॉर्क मध्ये वाढली. तिचे वडील पाकिस्तानी तर आई चेक होती.2. ती ६ वर्षांची असतानाच आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर लगेच काही वर्षांत तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. नर्गिस एका गरीब वस्तीत रहायची. वयाच्या १२ व्या वर्षांपासून कुटुंबाला मदत करण्यासाठी तिने वेटर म्हणून आणि इतर नोकर्‍या केल्या.3. मॉडेलिंगमध्ये येण्यापूर्वी नर्गिसने सायकोलॉजी आणि फाइन आर्ट्समध्ये डिग्री मिळवली आहे. तिला थेरपी टीचर व्ह्ययचे होते.4. स्पेनिशबहुल भागात नर्गिस वाढली. आपले आडनाव जाहीर झाले तर करियरवर विपरित परिणाम होईल, अशी भीती तिला प्रारंभीच्या काळात वाटायची.5. कायम प्रवास करणारा मनुष्य तिचा आदर्श आहे.6. रॉकस्टारची ऑफर येण्यापूर्वी नर्गिसला बॉलिवूडमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता.7. तिला नवनवीन पदार्थ बनवून खायला आवडतात.8. भारतात येण्यापूर्वी नर्गिसचे ब्रेक अप झाले होते. ती ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होती.9. नर्गिसचा लग्नावर फारसा विश्‍वास नाही. प्रेम आणि करियर यापैकी ती करियरला जास्त प्राधान्य देते.10. रॉक स्टारच्या शूटिंगदरम्यान नर्गिस-रणबीर यांचे अफेयर असल्याची चर्चा होती. यानंतर तिचे नाव उदय चोपडा सोबत जोडले गेले.