Join us  

नर्गिस फाखरीने अर्ध्यावर सोडले ‘अमावस’चे प्रमोशन; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 2:40 PM

अभिनेत्री नर्गिस फाखरी दीर्घकाळानंतर बॉलिवूडच्या कुठल्या चित्रपटात झळकणार आहे. होय, नर्गिसचा ‘अमावस’ हा हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तूर्तास या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. दुसरीकडे नर्गिस गायब आहे.

ठळक मुद्देनर्गिसचा बॉयफ्रेन्ड मॅट हा अमेरिकन दिग्दर्शक आहे. मध्यंतरी दोघांच्याही अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या.

अभिनेत्री नर्गिस फाखरी दीर्घकाळानंतर बॉलिवूडच्या कुठल्या चित्रपटात झळकणार आहे. होय, नर्गिसचा ‘अमावस’ हा हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भूषण पटेल दिग्दर्शित या चित्रपटात नर्गिससोबत अभिनेता सचिन जोशी लीड रोलमध्ये आहेत. तूर्तास या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. दुसरीकडे नर्गिस गायब आहे. होय, प्रमोशन सोडून नर्गिस अमेरिकेला परतली आहे. याचे कारण काय तर तिचा बॉयफ्रेन्ड मॅट अलोंजो.

नर्गिस व मॅट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरु असल्याचे कळतेय. यामुळे नर्गिस सध्या कमालीची चिंतीत आहे.  चित्रपटाचे प्रमोशन अर्धवट सोडून अचानक तिने अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला, तो याचमुळे. ‘अमावस’चे निर्मातेही यामुळे अवाक् झालेत.

स्पॉटबॉयने प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या दोन दिवस प्रमोशन अगदी चांगले झाले. पण यानंतर अचानक नर्गिस नखरे दाखवू लागली. सिटी टूर व प्रमोशनच्या प्रत्येक इव्हेंटला आपण हजर असू, असे नर्गिसने कबुल केले होते. पण प्रमोशनची वेळ येताच ती पलटली. त्यामुळेच निर्माते अनेक शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करू शकले नाहीत. तिच्या जागी नवनीत कौर ढिल्लो सध्या चित्रपटाचे प्रमोशन करतेय. निर्मात्यांनी अनेकदा नर्गिसला परतण्याची विनंती केली. पण नर्गिसने त्याकडे दुर्लक्ष केले. आता नर्गिस असे का करतेय, हे कळायला मार्ग नाही.   प्रमोशनमध्ये तिला रस नाही की अख्ख्या चित्रपटातचं रस उरलेला नाही, हे तिचे तिलाचं ठाऊक?नर्गिसचा बॉयफ्रेन्ड मॅट हा अमेरिकन दिग्दर्शक आहे. मध्यंतरी दोघांच्याही अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. नर्गिसने आपल्या सोशल अकाऊंटवर मॅटचे अनेक व्हिडिओ शेअर केले होते.

टॅग्स :नर्गिस फाकरी