Join us  

NCB पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर छापा, ड्रायव्हर ताब्यात

By रूपाली मुधोळकर | Published: November 09, 2020 2:16 PM

आधीच कोठडीत आहे अर्जुनच्या प्रेयसीचा भाऊ

ठळक मुद्देएनसीबीच्या टीमने शनिवारी रात्री बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या घरावर छापा मारला होता.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी एनसीबीच्या एका टीमने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरी छापा टाकत अर्जुनच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आधीच कोठडीत आहे अर्जुनच्या प्रेयसीचा भाऊ

 

याआधी एनसीबीने अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमिट्रिएड्सचा भाऊ एगीसलोस डेमेट्रिएड्स याला अटक केली होती. नुकताच त्याला जामीन मिळाला होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर एनसीबीने त्याला पुन्हा ताब्यात घेतले होते  त्याच्याकडून चरस आणि Alprazolam टॅबलेट जप्त करण्यात आल्या होत्या. एनसीबीच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, रिया, शौविक, दीपेश सावंत व सॅम्युअल मिरांडाने ज्यांच्याकडून कथितरित्या ड्रग्ज खरेदी केली होती, त्याच ड्रग्ज पेडलर्सच्या एगीसलोस संपर्कात होता.एगीसलोस हा अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला  हिचा भाऊ आहे. गॅब्रिएला व अर्जुन रामपाल अनेक वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत आहेत. 18 जुलै 2019 रोजी गॅब्रिएलाने अर्जुनच्या मुलाला जन्म दिला. दोघांचे अद्याप लग्न झालेले नाही.

निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावरही छापा

एनसीबीच्या टीमने शनिवारी रात्री बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या घरावर छापा मारला होता. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडियाडवाला यांच्या घरातून 10 ग्रॅम गांजा व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.  एनसीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. फिरोज नाडियाडवाला हे बॉलिवूडचे मोठे नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात फिर हेराफेरी, आवारा पागल दीवाना, फूल अ‍ॅण्ड फायनल, वेलकम, कारतूस या चित्रपटांचा समावेश आहे.

अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला अटक; ड्रग्जप्रकरणी NCBची कारवाई 

कधी कधी मला तुझे ओठ...असे का? वाचा, ट्रोलरच्या प्रश्नावर अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने काय दिले उत्तर

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने या प्रकरणाची धडक कारवाई करत, रिया चक्रवर्तीला अटक केली होती. तिच्यासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती व अन्य लोकांना अटक केली होती. रिया चक्रवर्तीची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र तिचा भाऊ शौविक अद्यापही तुरुंगात आहे. यापाठोपाठ एनसीबीने दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रींना समन्स बजावत त्यांची चौकशी केली होती.  काही दिवसांपूर्वी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अ‍ॅगिसिओस डेमेट्रिएडस याला अटक केली होती.

टॅग्स :अर्जुन रामपालनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो