Join us  

Namrata Shirodkar birthday : 14 वर्षे मोठ्या ‘महेश’ला सोडून 4 वर्षे लहान ‘महेश’शी केलं लग्न..., इंटरेस्टिंग आहे नम्रताची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 10:44 AM

Namrata Shirodkar birthday : एक ‘महेश’ नम्रताच्या आयुष्यातून गेला. पण नियतीने कदाचित दुसरा ‘महेश’ तिच्या नशीबात आधीच लिहून ठेवला होता....

Namrata Shirodkar birthday : बॉलिवूडमध्ये थोड्या कालावधीसाठी का होईना पण स्वत:च्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता शिरोडकर. आज नम्रताचा वाढदिवस. कधी काळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी आणि सौंदर्याने घायाळ करणारी नम्रता आता दोन मुलांची आई आहे. ग्लॅमरच्या झगमगाटापासून दूर असलेल्या नम्रतात गेल्या काही वर्षांत बराच बदल झालाय.

नम्रता मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची नात. तिची बहीण शिल्पा शिरोडकर ही सुद्धा अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नम्रता शिरोडकरने १९९३ साली ‘मिस इंडिया’ हा किताब जिंकला आणि बॉलिवूडची कवाडे तिच्यासाठी उघडी झालीत. पहिल्याच चित्रपटात तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचं नाव होतं, ‘जब प्यार किसीसे होता है’. या चित्रपटाने नम्रताचा चेहरा लोकांच्या डोळ्यांत भरला. पण तिला खरी ओळख दिली ती ‘वास्तव’ या सिनेमाने.

१९९९ साली आलेल्या ‘वास्तव’ चित्रपटात संजय दत्त सोबत काम केल्यावर तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला विविध पुरस्कार मिळाले. याचदरम्यान नम्रता साऊथ इंडस्ट्रीकडेही वळली. ‘वास्तव’ याच सिनेमाच्या दरम्यान नम्रता शिरोडकरच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्रीही झाली. होय, चित्रपटाचं शूटींग सुरू होत नाही तोच, नम्रता व महेश मांजरेकरांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. असं म्हणतात की,  या चित्रपटाच्या सेटवर महेश व नम्रता एकमेकांजवळ आलेत. अर्थात पण हे नातं फार काळ टिकलं नाही. कारण महेश मांजरेकर आधीच विवाहित होते. एक महेश नम्रताच्या आयुष्यातून गेला. पण नियतीने कदाचित दुसरा महेश तिच्या नशीबात आधीच लिहून ठेवला होता.

‘वास्तव’नंतर 2000 मध्ये ‘वामसी’ हा तेलगू सिनेमा नम्रताने साईन केला. या चित्रपटात नम्रताचा हिरो होता तो महेशबाबू. पहिल्याच नजरेत महेशबाबू स्वत:पेक्षा चार वर्षांनी मोठ्या नम्रताच्या प्रेमात पडला. नम्रताही महेशबाबूमध्ये गुंतली. पण मीडियाच्या नजरेपासून दोघांनीही हे प्रेम लपवून ठेवलं. नम्रताबद्दल महेशबाबूने सर्वप्रथम त्याच्या बहिणीला सांगितलं होते. चार वर्षे नम्रता व महेशबाबूंनी आपले प्रेम जगापासून लपवून ठेवलं आणि नंतर 10 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केलं.  नम्रताला एक मुलगा व एक मुलगी असून ती सध्या हैदराबादला तिच्या परिवारासोबत राहते.

लग्नाआधी महेशबाबूनं ठेवली होती ही अटलग्नानंतर नम्रतानं आपल्या बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. याचं कारण म्हणजे, लग्नाआधी महेशबाबूनं ठेवलेली अट. माझ्याशी लग्न करायचं असेल तर अॅक्टिंग हे करिअर सोडावं लागेल,अशी महेशबाबूची अट होती. कारण त्याला वर्किंग वाईफ नको होती. हे त्यानं सुरुवातीला क्लिअर केलं होतं. नम्रतानं देखील महेश बाबुसमोर काही अटी ठेवल्या होत्या. दोघांनीही एकमेकांच्या अटी मान्य केल्या आणि महेशबाबू व नम्रताचं लग्न झालं.

टॅग्स :नम्रता शिरोडकरमहेश बाबूमहेश मांजरेकर बॉलिवूड