Join us

अमिताभ बच्चन यांच्या नावाने हिंदू-मुस्लिमांच्या भावना भडकविणारा मॅसेज होतोय व्हायरल, पण काय आहे सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:46 IST

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक मॅसेज चांगलाच व्हायरल होत आहे. या मॅसेजबद्दल ...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक मॅसेज चांगलाच व्हायरल होत आहे. या मॅसेजबद्दल महानायक अमिताभ यांनी जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्टपणे ट्विटच्या माध्यमातून नकार दिला. अमिताभ यांनी ट्विट करून लिहिले की, हा मॅसेज फेक आहे. माझा आणि माझ्या डिजिटल टीमचा या मॅसेजशी काहीही संबंध नाही. व्हायरल होत असलेल्या या मॅसेजमध्ये हिंदू-मुस्लीम यांच्यातील द्वेषपूर्ण भावनांचा उल्लेख करण्यात आला आहे. बिग बीने ट्विटर हॅण्डलवर या बनावट अकाउंटवरील मॅसेजचा एक स्कीनशॉट शेअर करताना लिहिले की, ‘अमिताभ बच्चन यांची अधिकृत डिजिटल टीम याविषयी स्पष्ट करते की, हा संदेश फेक आहे. बदनामी करण्यासाठी अशाप्रकारचा कट रचण्यात आला आहे.’ बिग बीने पुढे लिहिले की, ‘या मॅसेजशी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या डिजिटल टीमचा काहीही संबंध नाही. युजर आणि चाहत्यांनी हा मॅसेज प्रसारित करू नये. कृपया तुमच्याकडे येताच डिलिट करावा.  दरम्यान, याप्रकरणी अमिताभ यांच्या डिजिटल टीमकडून सायबर गुन्हे शाखेत तक्रार नोंदविण्यात आली आहे. वास्तविक महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव असतात. नेहमीच ते विविध मुद्द्यांवर आधारित पोस्ट, व्हिडीओ आणि फोटोज् शेअर करीत असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठीही बिग बी सोशल मीडियाचा आधार घेताना दिसतात. अशात त्यांच्या नावे एक मॅसेज व्हायरल होत असून, तो फेक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.