Join us  

चंदेरी दुनियेला बाय बाय केलेल्या नदियाँ के पारची गुंजाने या सिनेमातून केले इंडस्ट्रीत कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 12:54 PM

'नदियाँ के पार' सिनेमाला मिळालेल्या यशामुळेच सूरज बडजात्या यांना 'हम आपके है कौन' सिनेमाची कल्पना सुचली. हा सिनेमा नदियाँ के पार सिनेमाच्या कथेवरच आधारित होता.

८० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेला 'नदियाँ के पार' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा. या सिनेमातील गुंजा ही भूमिका रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. अभिनेत्री साधना सिंह यांनी ही भूमिका साकारली होती. साधना सिंह बहिणीसोबत एका सिनेमाची शुटिंग पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सूरज बडजात्या यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्या नदियाँ के पार सिनेमाच्या गुंजा बनल्या.  

मुळात 'नदियाँ के पार' सिनेमाला मिळालेल्या यशामुळेच सूरज बडजात्या यांना 'हम आपके है कौन' सिनेमाची कल्पना सुचली. हा सिनेमा नदियाँ के पार सिनेमाच्या कथेवरच आधारित होता. हम आपके है कौन सिनेमातील सलमान खान आणि माधुरी दीक्षित या जोडीला एका रात्रीत स्टार बनवलं. 

'नदियाँ के पार'  सिनेमा १ जानेवारी १९८२ रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता. यानंतर साधना सिंह 'पिया मिलन', 'ससुराल', 'फलक', 'पापी संसार' अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. मात्र अचानक त्या या चंदेरी दुनियापासून दूर गेल्या आणि संसारात रमल्या. आपल्याला हव्या तशा भूमिका साकारायच्यात तसे सिनेमा बनत नसल्याने सिनेसृष्टीपासून दूर जात असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. जवळपास 30 वर्षाहून अधिक काळानंतर साधना सिंह यांनी इंडस्ट्रीत कमबॅक केले. 

हृतिक रोशनचा 'सुपर 30' या सिनेमात साधना इतक्या वर्षानंतर झळकल्या. तसेच याआधीही 2016 मध्ये प्रदर्शित झालेला जुगनी सिनेमातही महत्त्वपूर्ण भूमिकेत साधना झळकल्या. लोकगायिकेच्या भूमिकेत त्या झळकल्या होत्या. 

टॅग्स :सुपर 30